स्मरणशक्ती आणि एकाग्रतेसाठी हे योगासन ठरेल प्रभावी

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर नकारात्मक परिणाम होत आहेत. आपण सतत मोबाईल किंवा इत्तर डिजिटल माध्यमे वापरतो त्यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात. मात्र आपल्या कामामुळे आपण हे वापरणे टाळू शकत नाही. अशा वेळी काही उपाय करणे गरजेचे आहे. जसे की योगासने, काही योगासने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास फायदेशीर ठरतात. तुम्ही दररोज ही योगासने केली तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.

योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. काही योगासने स्मरणशक्ती वाढविण्यास, एकाग्रता सुधारण्यास आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जातात.

हेडस्टँड
शीर्षासन हे करायला कठीण असे आसन आहे. या आसनाचा सराव करण्यासाठी डोकं जमिनीवर टेकवून पूर्ण शरीराचा तोल साधता येणे आवश्यक आहे. हा तोल फार महत्त्वाचा आहे. हे असं केल्याने मेंदूमध्ये रक्ताभिसरण वाढते. एकाग्रता सुधारते. यामुळे ताण आणि थकवा देखील दूर होतो.

तडसन
या योगासनाचा सराव करताना सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे रहा. तुमच्या दोन्ही हातांची बोटे आणि पंजे खुले ठेवा. आता दोन्ही हात नमस्काराच्या मुद्रेत जोडून डोक्यावर घ्या. या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही हात कानाजवळून जायला हवेत. ताडासन केल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यामुळे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

कपालभाती प्राणायाम
हिमालयात राहणारे भारतातील प्राचीन योगी देखील शरीर शुद्ध करण्यासाठी कपालभातीचा सराव करत असत. कपालभातीच्या सरावाने शरीरात वर्षानुवर्षे साचलेली अशुद्धताही बाहेर पडते. हे केवळ शरीरच नाही तर मन देखील शांत ठेवण्यास मदत करते. कपालभाती प्राणायम करण्यासाठी सर्वात आधी पद्मासनात बसून दोन्ही हातांनी चित्त मुद्रा करा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. या दरम्यान पोट आतल्या बाजूला खेचा. जर तुम्ही कपालभाती प्राणायम करायला सुरुवात करत असाल तर फक्त 5-10 मिनिटे सराव करा आणि वेळेनुसार सराव वाढवू शकता. हे केल्याने मेंदूतील विषारी पदार्थ बाहेर पडतात, स्मरणशक्ती सुधारते.

वज्रसन
या आसनाचा सराव करण्यासाठी, वज्रासनात बसा, डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. दररोज ५-१० मिनिटे या आसनाचा सराव करा. यामुळे मानसिक शांतता मिळते, एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते.

Comments are closed.