Parenting Tips: दिवसभर झोपतात आणि रात्रीच का जागतात बाळं?

प्रत्येक आई एका गोष्टीमुळे वैतागून जाते, ते म्हणजे रात्रीच बाळं का झोपत नाही? आपण पाहतो की नवजात बाळं दिवसभर झोपतात पण नेमके रात्री जेव्हा झोपायची वेळी असते तेव्हाच बाळं अस्वस्थ होतात, रडतात…पण या मागचे नेमके कारण आपल्याला समजत नाही. पण खरे तर नवजात बाळांना वेळेची समज नसते. त्यांना दिवस आणि रात्र यामधील फरक कळत नाही. त्यामुळेच अनेकदा असे होते की बाळं रात्रीच्या वेळीच झोपत नाहीत. ( Why New Born Babies Don’t Sleep At Night? )

रात्रीच का जागतात बाळं?
तज्ञांच्या मते, बाळ जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा दिवसभर आई कामात असल्याने बाळ कायम एका मुव्हिंग पोझिशनमध्ये असते. जसे झोळी किंवा पाळणा हलवल्यावर बाळाला झोप लागते, तसेच आईची दिवसभर हालचाल होत असल्याने बाळ पोटात झोपी जाते. रात्री झोपल्यावर आईची हालचाल होत नाही. त्यामुळे त्यावेळी मग बाळ जागे असते. हेच त्याचे चक्र जन्माला आल्यानंतरही सुरू असते. कारण त्याचा मेंदू सुरूवातीला दिवस आणि रात्र यांच्यातला फरक ओळखू शकत नाही. त्यामुळे बहुतांश बाळं रात्री जागी असतात आणि दिवसा झोपतात.

  • अशा वेळी पालकांनी बाळांना योग्य झोपेची सवय लावणे गरजेचे आहे. म्हणजेच दिवसा बाळांना कमी वेळ झोपू द्यावे आणि रात्री त्यांना झोपण्याची सवय लावावी.
  • घरात दिवसा अंधार करणे टाळावे. यामुळे बाळ दिवसा जास्त वेळ झोपणार नाही.
  • रात्री झोपेची वेळ झाली की, घरातील वातावरण शांत ठेवावे, यामुळे बाळाला झोप येईल.
  • झोपण्यापूर्वी बाळाला हलके मालिश करावे त्यामुळे बाळ लवकर झोपेल.
  • रात्री बाळं जागी राहतात त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे भूक असू शकते. त्यामुळे झोपण्यापूर्वीच बाळाला पोटभर दूध पाजा.
  • बाळाला रात्री झोपण्यापूर्वी शॉलमध्ये गुंडाळून ठेवावे. यामुळे त्यांना ऊब जाणवते आणि बाळं डचकून उठत नाहीत. मात्र बाळाचा चेहरा नेहमी उघड ठेवावा.
  • तसेच झोपण्यापूर्वी बाळाला आरामदायी हलके कपडे घालावे.

Comments are closed.