Maharashtrain Look : दसऱ्यासाठी मराठमोळा लूक हवाय? या टिप्स करा फॉलो
सणसमारंभासाठी सुरू झाले की, आपल्याला नवीन कपडे हवे असतात. आता तर दसरा सुद्धा आला आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या या उत्सवानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. तुम्ही दसऱ्यासाठी मराठमोळा लूक करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मराठमोळा लूक हा सण-समारंभ आणि कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमासाठी करण्यात येतो. दसऱ्यासाठी सहावारी साडी कायम नेसली जाते पण तुम्ही यंदा नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासंदर्भात टिप्स,
नऊवारी साडी –
मराठमोळा लूक महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारी पारंपरिक वेशभूषा आहे. यात तुम्ही सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी नेसू शकता. नऊवारी साडी आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लूक तुम्ही करू शकता. साडीवर मॅचिंग आणि कॉन्ट्रास्ट अशा दोन्ही पद्धतींचा ब्लाउज घालता येईल.
हेही वाचा – लिप बाममुळे ओठ गुलाबी नव्हे पडतील काळे; एकदा हे वाचा
पारंपरिक दागिने –
सध्या पुन्हा एकदा पारंपरिक दागिने घालण्याचा ट्रेंड सुरू आहे. तुम्ही दसऱ्याला हे दागिने घालू शकता. या दागिन्यांमुळे मराठमोळा लूक परिपूर्ण दिसेल. बोरमाळ, कुड्या, बाळी, अग्रफूल, ठुशी, नथ, लक्ष्मीहार, कोल्हापूरी साज आदी दागिने तुम्हाला मराठमोळा लूक देतील.
शेला –

नऊवारी साडी नेसणार असाल तर त्यावर शेला अवश्य घ्या. यामुळे साडी अधिक खुलून दिसेल. साडीच्या पदाराला मॅचिंग असा शेला तुम्ही घेऊ शकता किंवा साडीला कॉन्ट्रास्ट असा शेला शोभून दिसेल.
केसांची हेअरस्टाईल –
पारंपरिक हेअरस्टाईलमध्ये तुम्ही केसांचा खोपा, अंबाडा बांधू शकता. त्यावर आर्टिफिशिअल फ्लॉवर किंवा खरी सुंगधी फुले, गजरा माळता येईल. या टिप्समुळे मराठमोळा लूक मिळण्यास नक्कीच मदत मिळेल.
हेही वाचा – Dussehra 2025 Shastra Puja: दसऱ्याला शस्त्रांची पूजा का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि पूजेची पद्धत
Comments are closed.