Dussehra : दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का देतात?
दसरा हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. आश्विन शुद्ध दशमीला दसरा सण साजरा केला जातो. या सणाला ‘विजयादशमी’ असे देखील म्हणतात. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला आणि सीतेला परत आणले. त्यामुळे हा सण ‘रावण दहन’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. दसरा हा सण पराजय आणि धर्माचा विजय याचे प्रतीक मानला जातो. महिषासुरासह अन्य राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीमातेचा अवतार घेऊन नऊ दिवस राक्षसांसोबत युद्ध केले होते. दशमीच्या दिवशी तिने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला. तेव्हापासून आश्विन महिन्यातील दशमी तिथीला दसरा हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना दिली जातात. पण, यामागचे कारण काय आहे जाणून घेऊयात.
आपट्याची पाने का देतात?
दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून देण्यामागची एक कथा अशी आहे की, प्रभू श्रीरामाने इंद्रदेवांना युद्धात हरवून त्यांच्याकडून 14 कोटी सुवर्ण मुद्रा मिळवल्या होत्या. या सुवर्ण मुद्रा आपट्याच्या पानावर सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते.
हेही वाचा – Dussehra : यंदा दसरा कधी, 1 की 2 ऑक्टोबर? जाणून घ्या दसऱ्याचा मुहूर्त
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. अशा विजयी वीरांना घरात आल्यावर त्यांची पत्नी किंवा बहीण ओवाळीत असे. या घटनेची स्मृती आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे.
आपट्याची पाने कशी भेट द्यावीत?
सकाळी स्नान करून, नवीन कपडे घालून आपट्याची पाने तोडावीत. ती पाने मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना भेट देऊन ‘सोनं घ्या सोन्यासारखं राहा.. ! असं म्हणतं शुभेच्छा द्या. हे करताना हसतमुख राहावे आणि सकारात्मक ऊर्जा द्यावी.
आपट्याची पूजा करताना मंत्र म्हणतात –
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण I
मला इच्छित लोकांचे दृश्य द्या, कुरु शत्रूचा नाश करतो
पानांचं महत्त्व –
आपटयाचे शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा (Bauhinia racemosa) असे आहे. दसर्याच्या दिवशी शमीची पानं आपल्या घरात ठेवावीत. यामुळे घरातील हवा शुद्ध होण्यास मदत होते. आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आढळतो. आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जातो. मुतखडा विकारात औषधामध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. याची पानं कफ आणि पित्त दोषांवर देखील गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.
हेही वाचा – Dussehra : यंदा दसरा कधी, 1 की 2 ऑक्टोबर? जाणून घ्या दसऱ्याचा मुहूर्त
Comments are closed.