टॉक्सिक रिलेशनशिपचे संकेत, वेळीच ओळखा आणि सावध व्हा

हल्ली दिवसाला रिलेशनशिपचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. कधी मायक्रो चीटिंग, सिच्युएशनशिप, कॅज्युअल रिलेशनशिप आदी. पण, सध्या रिलेशनशिपसंबंधित एक शब्द खूप जास्त प्रमाणात वापरला जातोय तो म्हणजे टॉक्सिक रिलेशनशिप. पण, टॉक्सिक बिहेविअर, टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे नेमके काय आणि त्याचे संकेत कोणते आहेत जाणून घेऊयात,

विषारी संबंध –

प्रेम, आदर आणि समजूतदारपणा हे कोणत्याही नात्यात मानसिक शांततेसाठी आवश्यक असतात. पण जेव्हा हे नाते तणाव, भीती आणि नकारात्मकतेने भरते तेव्हा नात्यात कडूपणा येऊन ते विषारी बनू शकते. यामुळे नात्यावर परिणाम होण्यास सुरुवात होते. अनेकदा नाते टिकवणे कठीण होते. काही नाती तर अशी असतात ज्यामध्ये तुमची घुसमट होते पण तरीही ते टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. नात्यात वारंवार दबाव, वरचढपणा जाणवू लागतो, ज्याला टॉक्सिक रिलेशनशिप असे म्हटले जाते. अशा नात्यात तुम्हाला आधार नसल्यासारखे वाटते, तुम्हाला पूर्णपणे चुकीचे समजले जाते, वारंवार तुमचा अपमान होतो.

हेही वाचा – नात्यात तुम्हाला ‘गॅसलाईट’ तर केलं जात नाही? जाणून घ्या महत्वाचे संकेत

विषारी संबंध सिग्नल –

  • जोडीदाराकडून सतत ओरडणे, शिवीगाळ करणे किंवा शारीरिक बळाचा वापर होणे.
  • जोडीदाराकडून तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे.
  • तुमच्या कामावर लक्ष ठेवणे, आवडीनिवडीवर बंधने घालणे.
  • इतरांसमोर तुमचा अपमान करणे किंवा तुम्हाला कमी लेखणे.
  • तुम्हाला महत्त्व न देणे. तुम्ही काय करता याला महत्त्व दिले जात नाही.
  • भावनांचा कदर न करणे. टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये जोडीदाराच्या भावनांचा कदर केला जात नाही.
  • जोडीदाराकडून भावनिक आणि शारीरिक छळ होणे.
  • अविश्वास दाखवणे, सतत संशय घेणे.

हेही वाचा – मुलांच्या या सवयी तरुणींना भावतात, जाणून घ्या या सवयी

Comments are closed.