Dussehra Wishesh : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर प्रियजनांना पाठवा या हटके शुभेच्छा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण दसरा. आज सर्वत्र दसऱ्याचा जल्लोष दिसत आहे. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने, पाटी-पुस्तके, सरस्वती पूजन आणि शस्त्राचे पूजन केले जाते. दसऱ्याच्या या पवित्र सणानिमित्त तुम्ही प्रियजनांना, नातेवाईकांना खास आणि हटके शुभेच्छा देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात या हटके शुभेच्छा,

साडेतीन मुहूर्तांपैकी एक
दसरा सण विजयाचा
देवीने केला वध असूराचा
दिन पराक्रमाचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

साडेतीन मुहूर्तांपैंकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा अन् विजयादशमीचा
दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

हेही वाचा – Dussehra: आपट्याची पानं म्हणून सर्रास कांचन पानांची विक्री; खरं सोनं कसे ओळखायचे?

जल्लोष विजयाचा
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा
दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

आंब्याच्या पानांच्या तोरणांनी दरवाजा सजला
झेंडुच्या फुलांनी दसऱ्याचा सण बहरला
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

सांगता नवरात्रीची
जल्लोष विजयाचा
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा..
दसऱ्याच्या शुभेच्छा !

वाईटावर चांगल्याची मात
महत्त्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेषाची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

वाईटांवर चांगल्याची मात
महत्त्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष – मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा – Dussehra 2025 Shastra Puja: दसऱ्याला शस्त्रांची पूजा का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि पूजेची पद्धत

Comments are closed.