चेहऱ्यावरील केस काढण्याचा सोपा मार्ग, त्वचेला होणार नाही नुकसान
चेहऱ्यावर केस येणे ही एक कॉमन समस्या आहे. हे केस काढण्यासाठी महिला वेगवेगळे उपाय करतात. हे केस काढण्यासाठी कोणी पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग करते तर कोणी वॅक्सिंग करते. याशिवाय चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अनेक उत्पादने बाजारातही उपलब्ध आहेत. मात्र, अशा उत्पादनांमध्ये काही केमिकल्स आढळतात, जी त्वचेसाठी घातक ठरतात आणि त्याचा वापर केल्यामुळे चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्हाला चेहऱ्यावरील केस नैसर्गिकरित्या दूर करायचे असतील तर काही घरगुती उपायांचा वापर करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. आज आपण जाणून घेऊयात हे उपाय
मध आणि साखरेचे मिश्रण –
एका भांड्यात 2 चमचे साखर, 1 चमचा मध आणि 1 चमचा पाणी मिक्स करून 30 सेकंद गरम करून घ्यावे. तयार मिश्रण पूर्णपणे वितळल्यावर चेहऱ्यावर वॅक्सप्रमाणे लावावे. आता कॉटन स्ट्रिपच्या मदतीने चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून घ्यावेत. या ट्रिकमुळे चेहऱ्यावरील सर्वात बारीक केसही सहजपणे निघतील.
हेही वाचा – लिप बाममुळे ओठ गुलाबी नव्हे पडतील काळे; एकदा हे वाचा
पपई आणि केळं –
एका भांड्यात पपईचा गर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे कोरफडीचे जेल घ्या आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वाळू द्यावे. पेस्ट वाळल्यानंतर केसांच्या विरुद्ध दिशेने घासून काढून टाका. यामुळे चेहऱ्यावरील केस निघतील.
चेहऱ्यावरील केस का काढावेत?
चेहऱ्यावर केस येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ते काढणेही. फक्त हे केस काढण्यासाठी वापरली जाणारी पद्धत योग्य असावी असे तज्ज्ञ सांगतात, जेणेकरून त्वचेचे नुकसान होण्याचा धोका संभवत नाही.
हेही वाचा – गालावरचे ओपन पोअर्स कमी करणारे सोपे उपाय
Comments are closed.