तरुणाईला लागलंय नॅनोशिपचे वेड, नात्याचा हा नवा प्रकार आहे तरी काय?
एक काळ असा होता जेव्हा नातेसंबंध, लग्न, प्रेम, कमिटमेंट या सर्व गोष्टींना फार महत्त्व होतं. लग्न म्हणजे आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचं वचन होतं. पण, आता जग पूर्णपणे बदललं आहे. आता नात्याचे नवनवीन प्रकार येत आहेत. सध्या ‘नॅनोशिप डेटिंग’ असा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे तरुणांमध्ये हा प्रचंड लोकप्रिय आहे. पण, हा शब्द ऐकून तुम्हाला नॅनोशिप म्हणजे काय? कपल यात नेमके कसे राहतात? असे प्रश्न पडले असतील. चला तर मग जाणून घेऊयात जेन झी जनरेशनमध्ये लोकप्रिय असलेले हे नॅनोशिप नेमकं आहे तरी काय,
नॉनशिप डेटिंग
नॅनोशिप डेटिंग म्हणजे अत्यंत कमी वेळेचे नाते. हे नाते केवळ काही आठवडे, दिवस टिकते आणि त्यानंतर दोन्ही व्यक्ती आपापल्या मार्गाने निघून जातात. बहुतेकदा हे नाते केवळ शारीरिक आकर्षण आणि तात्पुरत्या भावनांवर आधारीत असते. एका रिसर्चनुसार, नॅनोशिप डेटिंग ऍप्स, सोशल मीडिया यामुळे वाढत आहे. नॅनोशिप डेटिंगमुळे आपलं फ्रीडम एन्जॉय करता येते.
हेही वाचा – टॉक्सिक रिलेशनशिपचे संकेत, वेळीच ओळखा आणि सावध व्हा
नॅनोशिप डेटिंगचे फायदे –
- नॅनोशिप डेटिंग काही बाबतीत फायदेशीर ठरते. विशेष करून ज्यांना जास्त वेळ नाते नको असते.
- नॅनोशिपमुळे कोणत्याही प्रकारची जबाबदारी अंगावर येत नाही.
- व्यक्तीला स्वत: इच्छेनुसार नाते निवडता येते.
- तात्पुरता आनंद शोधता येतो.
नॅनोशिप डेटिंगचे तोटे –
- नॅनोशिप डेटिंग करणे भावनिक आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते.
- नॅनोशिपमध्ये नाते लवकर संपूष्टात येते. अशा परिस्थितीत मानसिक त्रास होऊ शकतो.
- नात्यात सफलत न आल्याने प्रेमावरचा विश्वास कमी होऊ शकतो.
- केवळ स्वत:वर नाही कुटूंबावरही याचा परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा – Micro Cheating: मायक्रो-चीटिंग का ठरते नात्यातील व्हिलन? जाणून घ्या काय असतात याचे संकेत
Comments are closed.