स्तनांचा आकार वाढत नाही? असू शकतात ही कारणे
साधारणपणे मुलींमध्ये स्तनांचा विकास हा 10 वर्षांपासून तर काही मुलींमध्ये 12 ते 13 वर्षांपासून होण्यास सुरुवात होते. चांगले स्तन महिलांचे शरीर सुसज्ज, परिपूर्ण आणि आकर्षक बनवण्यास मदत करतात. त्यामुळे मुलींच्या शारीरिक विकासासह स्तनांचा आकार योग्य असणे आवश्यक असते. पण, बऱ्याच मुली अशा असतात ज्या वयात असूनही त्यांच्या स्तनांचा आकार लहान असतो. यासाठी लाइफस्टाइलशी निगडीत काही गोष्टी जबाबदार असू शकतात असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आज आपण अशी काही साधारण कारणे पाहूयात, ज्यामुळे स्तनांचा विकास होत नाही.
हार्मोन्सचे असंतुलन –
स्तनांचा आकार न वाढण्यामागे हार्मोन्सचे असंतुलन असू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, स्तनांच्या विकासासाठी इस्ट्रोजेन हार्मोन जबाबदार असते. अशा परिस्थितीत, इस्ट्रोजेन हार्मोनच्या कमतरतेमुळे आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या जास्त प्रमाणामुळे स्तनाचा आकार वाढत नाही.
वजन कमी –
ज्या मुली किंवा महिला यांचे वजन कमी असते, त्यांच्या स्तनाचे आकार देखील लहान असतात. त्यामुळे स्तनाच्या आकारासाठी वजन देखील कारणीभूत ठरते. तुमच्या स्तनाचा आकार वाढवायचा असेल तर वजन वाढण्यावर भर द्यावा.
हेही वाचा – चेहऱ्यावरील केस काढण्याचा सोपा मार्ग, त्वचेला होणार नाही नुकसान
पोषकतत्वांचा अभाव –
आहारातील पोषकतत्वांचा अभाव असणे हे देखील स्तन न वाढण्यामागे कारण असू शकते. त्यामुळे स्तन विकासासाठी पोषकतत्त्वांनी परिपूर्ण घ्यावा.
अनुवांशिक कारणे –
अनेकदा स्तनाचा आकार न वाढण्यामागे अनुवांशिकता असू शकते. जर आईचे किंवा कुटूंबातील इतर महिलेचे स्तन आकार लहान असतील तर पुढील पिढीमध्ये ही समस्या प्रकर्षाने दिसून येते.
रक्त प्रवाहाची कमतरता –
महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, स्तनांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होत नसेल तर त्यांची वाढ होत नाही. त्यामुळे शरीरात रक्तपुरवठा किंवा ब्लड सर्कुलेशन सुरळीत होणे आवश्यक आहे.
हेही वाचा – Health Tips: मासिक पाळीच्या काळात जिमला जावे का? जाणून घ्या थेट तज्ञांचे मत
Comments are closed.