Shubman Gill : शुभमन गिलचा मोठा विक्रम; सुनील गावस्करांच्या 47 वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबरी
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला 2 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा पहिला डाव 162 धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने चहापानाच्या वेळेपर्यंत 4 विकेट गमावत 164 धावांची आघाडी घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे कर्णधार शुभमन गिल पहिल्या डावात 50 धावा करून बाद झाला. मात्र त्याने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या 47 वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Comments are closed.