मासिक पाळीच्या वेदना आणि ऑफिसचे काम, असे करा मॅनेज
मासिक पाळी आणि ऑफिसचे काम हा एक अतिशय त्रासदायक अनुभव असतो. मासिक पाळीमुळे शारीरिक त्रास होतोच शिवाय मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यात ऑफिसमध्ये काम करताना मासिक पाळीच्या वेदना हे प्रत्येक महिलेसाठी एक आव्हान असते. त्यात जर तुम्हाला या दिवसात जास्त त्रास होत असेल तर हे आणखीनच त्रासदायक ठरते. त्यामुळे आज आपण अशा टिप्स जाणून घेऊयात ज्याद्वारे मासिक पाळीच्या वेदना आणि ऑफिसचे काम या दोन्ही गोष्टी मॅनेज करता येतील.
भरपूर पाणी प्यावे –
मुबलक पाणी प्यायल्याने थकवा जाणवत नाही. पाण्यामुळे स्नायू सुरळीत काम करतात. ज्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना आणि सूज दोन्ही कमी होतात. ज्यामुळे ऑफिसचे काम तुम्ही व्यवस्थित करू शकाल.
हेही वाचा – मासिक पाळी येताच झाडाशी लावतात लग्न, भारतात पाळली जाते विचित्र प्रथा
पाठीला आधार द्या –
मासिक पाळी सुरू असताना काम करताना पाठीला आधार मिळेल असे बसावे. कारण या दिवसात होणारे बॅकपेन खूप जास्त त्रासदायक असते.
शरीराचा ताण
ऑफिसमध्ये डेस्क जॉब असेल तर दिवसभर बसून काम करावे लागते. अशा परिस्थितीत काम करताना बॉडी स्ट्रेच अवश्य करावे. यामुळे शरीराला आराम मिळेल आणि काम मन लावून करता येईल.
सैल कपडे घाला –
मासिक पाळी सुरू असताना ऑफिसमध्ये सैल कपडे घालावेत. घट्ट कपडे घालू शकता. ऑफिसमध्ये घालण्यासाठी स्कर्टचा ऑप्शन उत्तम आहे.
सॅनिटरी पॅड सोबत ठेवा –
मासिक पाळीच्या दिवसात बॅगेत सॅनिटरी नॅपकिन सोबत ठेवावे. कारण रक्तस्त्राव जास्त झाल्यास ते तुम्हाला उपयुक्त पडू शकते. पॅड बदलल्यानंतर तुम्ही पुन्हा काम सुरू करू शकता.
हेही वाचा – Health Tips: मासिक पाळीच्या काळात जिमला जावे का? जाणून घ्या थेट तज्ञांचे मत
Comments are closed.