Beauty Trend: ऐकावे ते नवलच; निरोगी त्वचेसाठी स्पर्म फेशियल; नेमका प्रकार काय?
निरोगी त्वचेसाठी अनेक पद्धती वापरल्या जातात. बाजारात यासाठी अनेक महागडी उत्पादने उपलब्ध आहेत. या उत्पादनांचा महिला नियमितपणे वापर करतात. तसेच अनेकदा काही महिला दर तीन किंवा सहा महिन्याला पार्लरमध्ये जाऊन फेशियल देखील करतात. यामध्ये विविध प्रकार असतात. जसे की, फ्रुट फेशियल, गोल्ड फेशियल, इत्यादी. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आजकाल स्पर्म फेशियलचा नवा ट्रेंड आला आहे. सॅल्मन स्पर्म फेशियलला आजकाल महिला पसंती देत आहेत. पण नेमका हा प्रकार काय? खरंच यासाठी स्पर्मचा वापर करतात का? ते जाणून घेऊया…( Salmon Sperm Facial )
सॅल्मन स्पर्म फेशियल म्हणजे काय? ( What Is Salon Sperm Facial )
सॅल्मन स्पर्म फेशियल हा ब्युटी ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ब्युटी ट्रीटमेंट एखाद्या प्राणी किंवा पुरुषाच्या नव्हे तर चक्क एका माशाचा स्पर्म वापरून केले जाते. सॅल्मन नावाच्या माशाच्या स्पर्मचा वापर केला जातो. या फेशियलची किंमत १५,००० रुपयांपर्यंत असते.
सॅल्मन स्पर्म फेशियलचे फायदे ( Benefits Of Salmon Sperm Facial )
- सॅल्मन स्पर्म फेशियल ट्रीटमेंट्स अँटी-एजिंगसाठी वापरल्या जातात.
- या माशाच्या स्पर्मने फेशियल केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि त्वचेचा रंग उजळतो.
- सॅल्मन स्पर्म फेशियलने त्वचा हायड्रेट राहते.
हेही महत्त्वाचे:
जर तुम्ही हे फेशियल करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसे की, जर तुम्हाला सीफूडची ऍलर्जी असेल तर हे फेशियल तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घेऊनच ही ब्युटी ट्रीटमेंट घ्यावी.
Comments are closed.