कोजागिरीला मसाला दूध का पितात? काय आहे यामागचे कारण
दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते. शरद पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ असे म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी मसाला दूध बनवून चंद्राच्या प्रकाशात ठेऊन पिण्याची प्रथा आहे. पण, यामागचे कारण तुम्हाला माहिती आहे का? कोजागिरीला मसाला दूध का पितात? यामागील वैज्ञानिक कारण काय आहे?
मसाला दुध पिण्यामागचे कारण
पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते. यानंतर पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते. वातावरणात सतत बदल होतात. अशा बदलत्या वातावरणात शरीराला ताकदीची अधिक गरज असते. ही ताकद दूधातून मिळते, कारण यात कॅल्शिअय असते. याशिवाय दुधात ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी मिक्स केले जाते. या पदार्थातील गुणधर्मांमुळे दुधाची गुणवत्ता आणखी वाढते. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध प्यायले जाते.
हेही वाचा – Bathroom Vastu Tips : रात्री बाथरूमचा दरवाजा उघडा का ठेवू नये?
चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवण्याचे कारण
पौराणिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. चंद्राचे किरण हे अमृतासमान असतात. या चंद्रकिरणांच्या संपर्कात दूध आल्याने अधिक औषधीयुक्त बनते आणि त्याचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होतात, असे सांगितले जाते. आयुर्वेदानुसार, चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे दूध प्यायल्याने शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. त्यामुळे या दिवशी चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा, यासाठी चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून नंतर त्याचे सेवन केले जाते.
शुभ वेळ –
पूजेसाठी शुभ मुहूर्त हा 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजून 45 मिनिटांपासून 7 ऑक्टोबर रोजी 12 वाजून 34 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे कोजागिरी पूजेसाठी 49 मिनिटांचा काळ शुभ असणार आहे. तर 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी चंद्रोदय होईल.
हेही वाचा – कोजागिरी पौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व
Comments are closed.