Relationship Tips : नात्यातील संशयाचे भूत कसे पळवाल?
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, संशयावरून नवऱ्याची बायकोला बेदम मारहाण, बायकोच्या सततच्या संशयावरून पतीची आत्महत्या अशा अनेक घटना आपण दररोज ऐकतो आणि मन सुन्न होतं. संशय नात्याला पोखरते आणि पती-पत्नीसोबत संपूर्ण कुटूंब यात होरपळून निघते. त्यामुळे नाते कोणतेही असो.. प्रेयसी-प्रियकराचे नाते असो.. नवरा-बायकोचे नाते असो, नात्यात संशयाचे भूत खूप घातक असते. या संशयामुळे एक जोडीदाराकडे दुर्लक्ष केले जाते, अविश्वास दाखवला जातो, समजून घेतले जात नाही. या सर्व गोष्टींमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. अशा परिस्थितात, नात्यातील संशयाचे भूत कसे काढायचे, हे समजून घेऊयात
- संशयाला दोघांमध्ये थारा द्यायचा नसेल तर जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलावे आणि त्यांच्या शंका जाणून घ्याव्यात.
- एकमेकांची मने जुळण्यासाठी आणि एकमेकांच्या आवडीनिवडी कळण्यासाठी काही वेळ एकत्र घालवावा.
- कोणत्याही पुराव्याशिवाय आपल्या जोडीदारावर संशय घेण्यापासून स्वतःला थांबवा. तुमच्या जोडीदाराशी मन मोकळे करा आणि तुम्हाला जोडीदाराबद्दल काय वाटते ते सांगा. थोडक्यात स्पष्ट बोला.
हेही वाचा – तरुणाईला लागलंय नॅनोशिपचे वेड, नात्याचा हा नवा प्रकार आहे तरी काय?
- काही वेळा आपण स्वतःचा विचार करून जोडीदारालाच दोषी मानतो. पण त्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार केला तर अनेक प्रश्न आणि संशय दूर होतात.
- एकमेकांसाठी वेळ काढणं जितके महत्त्वाचे आहे तितकाच एखाद्या व्यक्तीचा स्पेस सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे जोडीदाराल तिचा स्पेस द्यावा.
इतर लोकांच्या गोष्टींनी प्रभावित होऊ नये हे महत्त्वाचे –
जर तुमच्या जोडीदाराविषयी दुसरे कोणी काही सांगत असेल तर त्याचे म्हणणे जरूर ऐका पण हुशारीने वागा. तुम्ही त्या व्यक्तीला पुरावा विचारला पाहिजे की तो तुमच्या जोडीदारावर कोणत्या आधारावर आरोप करत आहे. जर तुम्हाला कोणताही पुरावा मिळाला नाही तर तुमच्या जोडीदारावर विनाकारण संशय घेऊ नका.
हेही वाचा – टॉक्सिक रिलेशनशिपचे संकेत, वेळीच ओळखा आणि सावध व्हा
Comments are closed.