पैठणीचा काठ वर्षानुवर्ष नव्यासारखा राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
महाराष्ट्राचे महावस्त्र अशी पैठणी साडीची ओळख आहे. महिलांनी कितीही साड्या असल्या तरी त्यात एकतरी पैठणी असावी अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. सणवारासाठी पैठणीसारख्या जरीच्या साड्यांना महिलांची विशेष पसंती दिसून येते. तसेच या साड्या महाग असल्याने त्या विशेष कार्यक्रमासाठी नेसल्या जातात. पण, अनेकजणींना या काठ पदराच्या साडीबाबत एक समस्या प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे काही दिवसांनी हळूहळू साड्यांचे काठ आणि जर काळपट पडत जातात किंवा त्यांची चमक नाहीशी होते. त्यामुळे जाणून घेऊयात पैठणीची जर वर्षानुवर्ष नव्यासारखी राहण्यासाठी टिप्स
टिपा –
- पैठणी किंवा काठपदराची साडी नेसल्यावर आपण अंगावर परफ्यूम मारतो किंवा थेट साडीवर मारला जातो. पण असे करू नये यामुळे साडीचे काठ खराब होण्याची शक्यता असते.
- पैठणीसारख्या महागड्या साड्या घरात चुकूनही धुवू नये. यामुळे साडीचे धागे खराब होतात.
- पैठणीचा रंग आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.
हेही वाचा – Fashion Tips : प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये असायला हवेत हे कपडे
- साडी नेसून झाल्यावर ती लगेच कपाटात ठेवू नये. पंख्यावर वाळवून मग कपाटात ठेवावी.
- काठपदराच्या साड्या सुती कापडात ठेवाव्यात. यामुळे साडीला हवा मिळते आणि ती खराब होत नाही.
पैठणी –
पैठणी ही महाराष्ट्राची एक पारंपरिक, रेशमी आणि हातमागावर विणलेली साडी आहे. या साडीचे नाव ‘पैठण’ शहरावरून पडले आहे. या शहरात तिची सुरुवात झाली. या साडीमध्ये पदरावर मोरासारखी चित्रे असलेले जरीकाम असते आणि ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानली जाते.
हेही वाचा – Hair Care: रात्री झोपताना केस बांधून झोपावं की सोडून? जाणून घ्या योग्य पद्धत
Comments are closed.