दररोज माउथवॉश वापरायचे की नाही? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

दातांच्या वाढत्या समस्या लक्षात घेत ओरल हायजिनबाबत लोक अधिक जागरूक झाले आहेत. दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी माउथवॉशचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तोडांची नीट सफाई केली नाही, तर मुखदुर्गंधीची समस्या उद्भवण्याची शक्यता दाट असते. अशा परिस्थितीत, दात आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी माउथवॉश करण्याचा सल्ला दिला जातो. पण, याचा दररोज वापर करणे खरंच योग्य आहे का? यासाठी जाणून घेऊयात त्याचे फायदे-तोटे,

माउथवॉश वापरण्याचे फायदे –

आपल्या तोंडात विविध प्रकारचे बॅक्टेरिया असतात. या बॅक्टेरियांचा निपटारा करण्यासाठी माउथवॉशचा वापर केला जातो. माउथवॉशमुळे तोंडाची दुर्गंधी आणि दात किडण्यापासून वाचतात. याशिवाय फ्रेशनेस येतो. त्यामुळे अनेक तज्ज्ञमंडळीकडून माउथवॉश वापरण्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा – हॉटेलमध्ये राहताना ‘या’ फ्लोरवरील रूम कधीच घेऊ नका, जाणून घ्या याचं कारण

माउथवॉश वापरण्याचे तोटे –

माउथवॉशच्या फायद्यांसोबतच काही तोटे देखील आहेत. बहुतेकजण माउथवॉश वापरल्यानंतर तोंडाची चव खराब झाल्याची तक्रार करतात. याशिवाय याच्या सततच्या वापरामुळे तोंड कोरडे होते आणि तहानही लागते. काहींना दातांवर डाग पडण्याची समस्या देखील जाणवली आहे. दात कमकुवत होतात आणि खरखरीत व्हायला सुरुवात होते.

वापर करणे योग्य की अयोग्य?

सर्वात आधी तर वापरत असलेल्या माउथवॉशचे लेबल वाचून घ्यावे. त्यावरील सुचनांचे पालन करावे. शक्य असल्यास सौम्य, अल्कोहोल विरहीत माउथवॉश वापरावे. दररोज वापरावे की नाही यासाठी तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. तसेच उत्तम म्हणजे नैसर्गिक माउथवॉशचा वापर करू शकता.

नैसर्गिक माउथवॉशचा करा वापर –

तुम्ही घरी कडूलिंब आणि पुदिन्याचा वापर करून नैसर्गिक माउथवॉश तयार करु शकता. यात कुठलेही केमिकल्स नसल्याने त्याचा आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

(टिप – वरिल दिलेली माहिती ही विविध स्त्रोतावरून उपलब्ध करण्यात आली आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

हेही वाचा – टिकली लावल्याने महिलांना होतोय ‘हा’ गंभीर आजार

Comments are closed.