Warm Clothes: हिवाळ्यापूर्वी उबदार कपडे धुताय? मग थांबा या चुका टाळा

हिवाळा ऋतू आता सुरू होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडी जाणवू लागते. तसेच यानंतर कडक ऊन पडत नाही. त्यामुळे यंदा हिवाळ्यापूर्वी तुम्ही तुमच्या घरातील थंडीचे कपडे जसे की, स्वेटर, लोकरीचे कपडे आणि चादर, ब्लॅंकेट धुवायला काढणार असाल तर काही टिप्स तुमच्या मदतीला येतील. उबदार कपड्यांचे फायबर्स इतर कपड्यांच्या तुलनेत कमजोर असतात. यामुळे अशा कपड्यांचे लवकर नुकसान होते. म्हणून उबदार कपड्यांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला चादर, ब्लँकेट आणि इतर लोकरीचे कपडे धुवायचे असतील तर त्यातील कुबटपणा दूर झाला पाहिजे.

लोकरीचे किंवा उबदार कपडे धुण्यासाठी नेहमी लिक्विड डिटर्जंट वापरावे. ​डिटर्जंट पावडरमुळे कपड्यांचे नुकसान होऊ शकते.

लोकरीचे कपडे धुण्यासाठी नेहमी थंड पाणी वापरा. ​​गरम पाण्यात हे कपडे धुतल्यास आकसतात.

लोकरीचे कपडे धुण्यापूर्वी उलटे करावे आणि कोमट पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवावे. जेणेकरून त्यातील धुळीचे कण किंवा चिकटलेले इतर कचरा घाण पाण्यात निघून जातील.

कपडे पाण्याने धुवावेत की, ड्रायक्लिन करावेत किंवा ते मशीनमध्ये धुवावे की नाही हेही टॅगवर दिलेले असते. म्हणून कपड्यांवर लावलेल्या टॅगकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

उबदार कपड्यांचे तंतू नाजूक असतात. त्याला स्वच्छ करताना ब्रश लावल्यास कपड्याचे तंतू खराब होऊ शकते. म्हणून शक्यतोवर उबदार कपड्यांना ब्रश लावू नये.

लोकरीचे कपडे धुल्यानंतर पिळू नका. ते एखाद्या दोरीवर लटकवा. जर हे कपडे तुम्ही पिळले तर कपड्यांचा आकार बदलू शकतो.

लोकरीचे कपडे धुतल्यानंतर ते नीट वाळवणे फार महत्वाचे आहे. उबदार कपडे कधीही थेट सूर्यप्रकाशात वाळवू नयेत, कारण यामुळे लोकरीचा रंग फिका होऊ शकतो आणि फॅब्रिक आकसू शकते.

कपडे धुऊन सुकल्यानंतर तुम्ही जिथे साठवणार आहात तिथे मैंथॉल बॉल्स, डांबराच्या गोळ्या, किटाणूनाशक प्लेक्स जरुर ठेवावेत. जेणेकरून उबदार कपडे किटाणूरहीत होतील.

Comments are closed.