Diwali Trending Outfits: दिवाळीसाठी आऊटफिट शोधताय? ‘हे’ आहेत ट्रेंडिंग ड्रेसेस
दरवर्षी दिवाळीची आतुरतेने वाट पाहिली जाते. दिवाळी जवळ आली की सर्व बाजारपेठा उजळून निघतात. खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. सणानिमित्त घर सजावटीच्या वस्तू, कपडे, भेटवस्तू अशी बरीच खरेदी केली जाते. तुम्हीही कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही ट्रेंडिंग आऊटफिट तुम्ही यंदाच्या दिवाळीला ट्राय करू शकता. ( Trending Outfits For Diwali 2025 )
दिवाळी 2025 साठी गाला गाउन)
आजकाल गाला गाऊनचा फॅशन ट्रेंड आहे. साटन, व्हेल्वेट, सिल्क ते कॉटनमध्ये हे गाऊन उपलब्ध असतात. सॅन-उत्सवांसह पार्टीसाठी हे एक उत्तम आऊटफिट आहे. आर्टिस्टिक डिझाइन, प्रिंट आणि फ्रिल्स असलेले गाऊन तुम्हाला ग्लॅमरस लूक देतात.
इंडो-वेस्टर्न आउटफिट्स (दिवाळी 2025 साठी इंडो-वेस्टर्न आउटफिट)
पारंपरिक आणि मॉडर्न कॉम्बिनेशन तुम्हाला तुमच्या आऊटफिटमध्ये हवे असेल तर इंडो-वेस्टर्न आउटफिट्स हा सर्वात चांगला पर्याय आहे. आजकाल सण- उत्सवांमध्ये या इंडो-वेस्टर्न आउटफिट्सना महिलांची विशेष पसंती असते. लॉन्ग स्कर्ट, धोती, जंपसूट, प्लाझो असे पॅटर्न तुम्ही निवडू शकता.
दिवाळी 2025 साठी अनारकली सूट)
अनारकली हा असा ड्रेस सर्वांना शोभून दिसतो. तसेच दिवाळीसारख्या सणासाठी हा उत्तम पर्याय आहे. अनारकली सुट्सना सण- उत्सव आणि लग्नसराईच्या काळात बाजारात प्रचंड मागणी असते. नेट, शिफॉन, जॉर्जेटपासून थेट कॉटनपर्यंत विविध कापडांमध्ये हे सुट्स उपलब्ध असतात. यावर जरी वर्क, हँडप्रिंट्स आणि ब्लॉक प्रिंटसह असंख्य डिझाईन असते.
लेहन्सागा (दिवाळी 2025 साठी लेहंगा)
लेहेंगा-चोली हा प्रकार फार पूर्वीपासून गुजराती आणि मारवाडी समाजात पाहायला मिळायचा. पण आता पारंपरिक लेहेंगा हा एक फॅशन ट्रेंड बनला आहे. अगदी प्रत्येक उत्सवासाठी तरुणींची लेहेंग्याला विशेष पसंती असते. या दिवाळीत लेहेंगा घालून तुम्ही एक पारंपरिक लूक मिळवू शकता.
साडी ( Saree For Diwali 2025 )
साडी प्रत्येक महिलेच्या आवडीचा विषय असतो. त्यामुळे साडी ही कधीच आऊट ऑफ फॅशन नसते. तुम्हाला दिवाळीला पारंपरिक लूक करायचा असेल तर सिल्क, जॉर्जेट, ऑर्गेन्झा, खादी, लिननच्या साड्या स्टाईल करू शकता. यासाठी तुम्ही वेगवेगळे डिझायनर ब्लाउज शिवून घेऊ शकता. ज्यामुळे तुमच्या साडीचा लूक आणखीनच खुलून दिसेल.
Comments are closed.