शाहरूख खानच्या फिटनेसचे सिक्रेट, आजच करा या पदार्थांचा आहारात समावेश

बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खान त्याच्या अभिनयासह फिटनेससाठी ओळखला जातो. आज शाहरूख खान 59 वर्षांचा असूनही फिटनेसबाबत अनेक तरूणांना मागे टाकेल. त्याचा स्क्रीनवरील चार्म, आत्मविश्वास, बॉडी लॅग्वेज आणि चमकणारी त्वचा पाहून अनेकांना कायम एकच प्रश्न पडतो की, वयाच्या 59 व्या वर्षीही शाहरूख इतका फिट कसा? त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात फिट राहण्यासाठी शाहरुख खान कोणते नियम फॉलो करतो. त्याच्या फिटनेसचे सिक्रेट

डाळी –

शाहरूख खान आपल्या आहारात डाळींचा समावेश करतो. डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्लांट बेस्ड प्रोटीन, फायबर, खनिजे असतात. डाळीतील ही पोषकतत्वे संतुलित आहाराचा उत्तम भाग आहे. डाळीमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते, पचन सुरळीत होते. त्यामुळे शाहरूख खान त्याच्या आहारात डाळी खातो.

हेही वाचा – दररोज माउथवॉश वापरायचे की नाही? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

मोड आलेली कडधान्ये –

मोड आलेली कडधान्ये शाहरुखच्या दैनंदिन आहाराचा भाग आहे. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे आणि पाचक एन्झाइम्स असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोड आलेले कडधान्ये पचायला सोपे असतात. यातील ऍटीऑक्सिडंट्स पेशींना नुकसानापासून वाचवतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात. याशिवाय कडधान्ये खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे किंग खान आपल्याला कायम ऍक्टिव्ह दिसतो.

ब्रोकोली –

ब्रोकोलीत फायबर, व्हिटॅमिन्स आणि ऍटीऑक्सिडंट्स आढळतात. फायबरमुळे पचनसंस्था सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो तर यातील ऍटीऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ कमी करतात. एकदरंच, आतड्यांचे आरोग्य उत्तम राहते. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आतड्यांचे आरोग्य उत्तम असते तेव्हा संपूर्ण शरीर हलके आणि फ्रेश वाटते. वृद्धत्वाची चिन्हे, थकवा दूर होतो.

ग्रील्ड चिकन –

शाहरुखच्या डाएटमधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे ग्रील्ड चिकन. तुम्ही जेव्हा 100 ग्रॅम ग्रील्ड चिकन खाता तेव्हा 30 ग्रॅम प्रोटीन मिळते, हे लक्षात घ्या. प्रोटीन स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि ताकदीसाठी आवश्यक घटक आहे. या पदार्थामुळे किंग खानला सतत ऊर्जावान राहण्याची ताकद मिळते.

याशिवाय शाहरूख फक्त दोन वेळाच जेवतो, दुपारी आणि रात्री. तसेच पांढरा भात, बेकरीतील पदार्थ, मैदा असलेले पदार्थ आणि दारूपासून दूर राहतो. तज्ज्ञांच्या मते, शाहरुखच्या तंदुरुस्तीचे खरे रहस्य आतड्यांचे आरोग्य आहे. आतड्यांचे आरोग्य जर उत्तम असेल तर त्वचा चमकदार राहते, मूड सुधारते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. एकदरंच शाहरूखच्या फिटनेसविषयी बोलायचे झाल्यास संतुलित आहार, साधी दिनचर्या हे सिक्रेट असल्याचे लक्षात येते.

हेही वाचा – Vitamin B 12 ची कमतरता दूर करणारे पदार्थ

Comments are closed.