Hair Braids : वेणी बांधणे ओल्ड फॅशन वाटते? फायदे वाचून रोजच बांधाल
शाळेत असताना तुम्ही केसांची वेणी बांधलीच असेल. कारण शाळेत वेणी बांधणे बंधनकारक असायचे. शाळेतल्या या नियमाचा जरी राग येत असला तरी तो नियम कसा बरोबर होता हे आता लक्षात येत आहेत, कारण केसांच्या दिवसाला वाढणाऱ्या ढीगभर समस्या आता डोकेदुखी ठरत आहेत. लहान असताना आई सारखी वेणी बांधायला सांगायची आणि आपण ते टाळायचो का तर ते ओल्ड फॅशन.. पण, आईचे ते म्हणणे खरे होते हे आता गळत्या केसांकडे पाहिल्यावर लक्षात येते.
केसांची वेणी बांधणे हे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. वेणी बांधल्याने केसांचा गुंता होत नाही, तुटणे कमी होते आणि प्रदुषणाचा केसांवर वाईट परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त केसांच्या मुळांवर ताण देखील येत नाही. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. यासाठीच मोकळ्या केसांऐवजी वेणी बांधावी, असे सांगितले जाते. जाणून घेऊयात वेणी बांधण्याचे फायदे
हेही वाचा – Hair Care: रात्री झोपताना केस बांधून झोपावं की सोडून? जाणून घ्या योग्य पद्धत
वेणी बांधण्याचे फायदे
- केसांची वेणी बांधल्याने तुटण्याचे आणि गळण्याचे प्रमाण कमी होते. कारण केस एकत्र बांधलेले राहतात.
- नियमित वेणी बांधल्याने केसांचे टोक दुभंगण्याचे प्रमाण कमी होते.
- वेणीमुळे केस ऊन, धूळ, माती आणि वारा यांच्या संपर्कात येत नाही, ज्यामुळे केसांचे नुकसान होत नाही.
- वेणी बांधल्यावर केस एकत्र बांधले जातात. ज्यामुळे केस एकमेकांत गुंतत नाहीत आणि घर्षणामुळे तुटत नाहीत.
- वेणी घातल्याने केसांचे तुटणे आणि गुंतागुंत कमी झाल्याने केसांची लांबी टिकवून ठेवण्यास मदत मिळते.
- साधी वेणी बांधल्याने केसांना सुंदर आणि आकर्षक लूक मिळतो.
वेणी बांधताना लक्षात ठेवा या गोष्टी –
- वेणी ओढून किंवा खूप घट्ट बांधू नये. यामुळे केसांच्या मुळांना आणि टाळूला नुकसान होऊ शकते.
- तेल लावून वेणी बांधल्याने केस मजबूत होतात आणि कोरडे पडत नाहीत.
- वेणी बांधल्यावर रबर बँडऐवजी मऊ कापडी रब्बर वापरावा, यामुळे केस तुटत नाहीत.
हेही वाचा – Diwali Trending Outfits: दिवाळीसाठी आऊटफिट शोधताय? ‘हे’ आहेत ट्रेंडिंग ड्रेसेस
Comments are closed.