लाल, पिवळा तर कधी जांभळा.. सरड्यासारखा रंग बदलणारा डोंगर

सरडा रंग बदलतो हे सर्वाना माहिती आहे. पण, जगात असा एक डोंगर आहे जो प्रत्येक दिवशी रंग बदलतो. हो .. हे खरं आहे. आजवर रंग बदलण्याचे हे कौशल्य फक्त सरड्यातच आहे असे आपल्याला वाटत होते मात्र असे नसून जगात एक असा डोंगर देखील आहे जो दर दिवसाला आपला रंग बदलतो. जाणून घेऊयात निर्सगाच्या या अद्भूत चमत्काराविषयी.

ऑस्ट्रेलियात आहे डोंगर –

प्रत्येक दिवशी रंग बदलणारा हा अनोखा डोंगर ऑस्ट्रेलियात आहे. जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत रंग बदलत असतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील हा पर्वत हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार मानला जातो. सकाळी सोनेरी, दुपारी लाल-केशरी आणि संध्याकाळी जांभळ्या छटांनी हा पर्वत झळाळून उठतो. याच रंग बदलणाऱ्या डोंगराच्या भागात काही आदिवासी लोक राहतात. या डोंगराला ‘उलुरू’ डोंगर किंवा ‘आर्यस रॉक’ असे म्हणतात. हा डोंगर अंडाकृती असून 335 मीटर उंच आहे, त्याच्या परिघ 7 किलोमीटर तर रुंदी 2.4 किलोमीटर इतकी आहे.

हेही वाचा – हॉटेलमध्ये राहताना ‘या’ फ्लोरवरील रूम कधीच घेऊ नका, जाणून घ्या याचं कारण

डोंगर पेटल्याचा होतो आभास –

हा डोंगर सुमारे 150 वर्षांपूर्वी शोधला गेला, अशी माहिती आढळते. सूर्याची किरणे त्यावर पडली की तो डोंगर जणू पेटलाय आणि त्यातून लाल व गडद लाल ज्वाळा बाहेर पडतायत असे वाटू लागते. त्याचप्रमाणे जेव्हा सूर्य संध्याकाळी फिकट गुलाबी होतो तेव्हा या डोंगरावर जांभळ्या सावल्या दिसू लागतात.

देवाचे घर –

डोंगराचा रंग बदलणे हा एक चमत्कार नसून त्याच्या विशेष निर्मितीमुळे असं घडून येते जे सूर्यप्रकाशाप्रमाणे बदलते. हवामानातील बदल यामुळे त्याचे रंग दिवसभर बदलत राहतात. हा पर्वत वालुकामय खडकापासून तयार झाला आहे. ज्याला ‘कंगलोमेरे ट्रॉक’ असे म्हणतात. डोंगर सकाळ आणि संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात लाल आणि केशरी दिसतो. संध्याकाळच्या वेळी सूर्यप्रकाशाशिवाय इतर रंग जास्त प्रमाणात दिसतात. रंगांच्या बदलामुळे प्राचीन काळी येथे राहणारे आदिवासी लोक याला ‘देवाचं घर’ मानत असत. हे आदिवासी डोंगराच्या पायथ्याशी बंदिस्त गुहांमध्ये पूजा करतात. आता या डोंगरावर जाण्यासाठी रस्ते देखील बांधण्यात आलेत. इथे मोठ्या संख्येने पर्यटक निसर्गाचा हा चमत्कार पाहायला येत असतात. आश्चर्याची बाब म्हणजे रंग बदलणारा हा डोंगर जगात एकमेव आहे.

हेही वाचा – Mysterious Moai Stones : चेहरा असलेले रहस्यमयी दगड

Comments are closed.