Deepa Malik: दिव्यंगत्वावर मात करून पॅरालिंपिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला

दीपा मलिक या पॅरालिंपिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू आहेत. त्यांनी २०१६ मध्ये रिओ पॅरालिंपिकमध्ये शॉटफूटमध्ये रौप्य पदक जिंकले. ट्युमरमुळे त्यांची सर्जरी झाली आणि त्यांचा कमरेपासूनच्या खालच्या भागाची हालचाल बंद झाली आणि त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला. मात्र आपल्या दिव्यंगत्वाला आपली ताकद बनवून त्यांनी इतिहास रचला.

दीपा मलिक यांचा जन्म 30 सप्टेंबर १९७० मध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना खेळात रुची होती. त्यामुळे त्यांनी लहानपणीच खेळांत करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचे विक्रम सिंह यांच्याशी लग्न झाले. ते भारतीय सैन्यात कर्नल होते. या दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना १९९९ त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर वयाच्या ३० व्या वर्षी त्यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. या दरम्यानच कारगिल युद्ध सुरू झाल्याने विक्रम सिंह यांना जावे लागले.

दीपा यांनी काही तपासण्या केल्यावर त्यांना पाठीच्या कण्यातील ट्यूमर झाल्याचे निदान झाले. विक्रम सिंह हे परतल्यावर दीपा यांची शस्त्रक्रिया झाली. ज्यामध्ये त्यांच्या खांद्यावर तब्बल १८३ टाके पडले. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या कमरेपासूनच्या खालच्या भागाची हालचाल थांबली. त्यानंतर त्यांना कायम व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला.

या कठीण परिस्थितीत दीपा यांनी हार न मानता खेळासाठी तयारी सुरू केली. १८ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर त्यांनी २०१० च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेकीत कांस्यपदक जिंकले. २०१४ मध्ये चायना ओपन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शॉटपुटमध्ये सुवर्ण पदक जिंकले. तर २०१६ मध्ये रिओ पॅरालिंपिकमध्ये शॉटफूटमध्ये रौप्य पदक जिंकले.

त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी २३ आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ६८ पदके जिंकली आहेत. हिमालयीन कार रॅलीमध्ये आमंत्रित झालेल्या त्या भारतातील पहिल्या महिला आहेत. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २०१२ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१४ मध्ये राष्ट्रपती रोल मॉडेल पुरस्कार आणि २०१९ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

Comments are closed.