रात्री वायफाय सुरु ठेवून झोपता? वाचा काय होतात परिणाम

हल्ली जवळपास सर्वांच्याच घरी वायफाय असतो. स्मार्टफोनप्रमाणे इंटरनेट आपल्या आयुष्याची गरज बनत चालला आहे. इंटरनेटशिवाय स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा स्मार्ट टी व्ही सारख्या इलेक्ट्रोनिक वस्तू इंटरेनेटशिवाय अपूर्ण आहेत. त्यामुळे कित्येक घरात वायफाय राउटर दिवसरात्र सुरुच असते. पण, गरज नसतानाही वायफाय सुरू ठेवणे गरजेचे आहे का? रात्रभर वायफाय सुरू ठेवल्याने वीज बिल वाढते का? याचा आरोग्यावर काही परिणाम होतो का? जाणून घेऊयात तज्ज्ञ काय सांगतात.

वायफायचे आरोग्यावर होणारे परिणाम –

  • वायफायमुळे अनेक सुविधा मिळतात यात शंका नाही पण, यासोबत अनेक आजार उद्भवतात हे देशील खरे आहे. पण, वायफाय राउटरमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे अनेक आजार उद्भवू शकतात.
  • रात्रभर इंटरनेट कनेक्शन सुरु राहिल्याने स्मार्टफोन्सवर नोटिफिकेशन्स सुरु राहतात. ज्यामुळे फोनवर स्क्रोलिंग सुरू राहते. झोप अपूर्ण होते. त्यामुळे रात्री वायफाय राउटर बंद ठेवावा.

हेही वाचा – Insect Bite Remedies : कीटक दंश झाल्यास त्वरीत करा हे उपाय

  • एका अभ्यासानुसार जे लोक वारंवार वायरलेस इंटरनेटच्या संपर्कात येतात त्यांचा स्पर्म काउंट कमी होतो.
  • रात्रभर वायफाय सुरु ठेवल्याने वीज बील जास्त येते असे म्हणतात. जे सत्य देखील आहे. रात्री वायफाय राउटर बंद केल्याने विजेची बचत होते.
  • झोपण्यापूर्वी वायफाय बंद केल्याने कनेक्शन सुरक्षित राहते आणि हॅकिंगचा धोका कमी होतो.
  • राउटर दिवसभर सुरु असल्याने जास्त गरम होते आणि हळूहळू त्याचा परफॉर्मन्सवर परिणाम होतो. त्यामुळे सततचा लोड कमी करण्यासाठी रात्री काही तास तुम्ही वायफाय बंद ठेवायला हवे.

रात्री वायफाय का बंद ठेवावा?

रात्री वायफाय सुरु ठेवावा का नाही हे पूर्णपणे तुमच्या गरजांवर अवलंबून आहे. रात्री स्मार्टफोनवर कामासंदर्भात कॉल्स, मेल्स, मेसेज येणार असतील तर नक्कीच सुरु ठेवायला हवा. पण, रात्री तुम्हाला विजेची बचत करायची असेल किंवा रेडिएशनचा संपर्क टाळायचा असेल रात्रभर वायफाय बंद करणे फायद्याचे ठरेल.

हेही वाचा – Health Tips: करपलेली चपाती, कुरकुरीत ब्रेड खाणं आरोग्यासाठी धोकादायक

Comments are closed.