Photo : Mumbai Metro 3 च्या भूमिगत मार्गाला प्रवाशांची पसंती
विधान भवन परिसर, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी रेल्वे स्थानक या दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर होणार्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे. कारण या मार्गावर आता भुयारी मेट्रो सुरू करण्यात आली आहे. आरे ते वरळीपर्यंतच्या मेट्रो 3 भुयारी मार्गिकेचा विस्तार कफ परेडपर्यंत करण्यात आला असून बुधवारपासून (ता. 8 ऑक्टोबर) आरे ते कफ परेड हे हा प्रवास सुरू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पहिल्याच दिवशी ही भुयारी मेट्रो प्रवाशांच्या पसंतीस उतरली असल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या भुयारी मेट्रोतून प्रवास करण्यासाठी सीएसएमटी मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
Comments are closed.