Pregnancy Travel Tips: प्रेग्नन्सीच्या काळात ट्रॅव्हल करावं का? जाणून घ्या सर्व काही

बऱ्याचदा प्रेग्नन्सीच्या काळात अचानक काम आल्याने ट्रॅव्हल करावं लागते. पण या काळात ट्रॅव्हल करताना महिलांना जास्त त्रास होऊ शकतो. तसेच किती काळ ट्रॅव्हल करू शकतो किंवा प्रेग्नन्सीच्या कोणत्या महिन्यात प्रवास करावा असे प्रश्न पडू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला प्रेग्नन्सीच्या काळात ट्रॅव्हल करायचे असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. ( Is travelling during Pregnancy Safe? )

पहिले तीन महिने
गर्भधारणेचे पहिले तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. या काळात डॉक्टर देखील फार दगदग न करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे या सुरुवातीच्या काळात ट्रॅव्हल करणे शक्यतो टाळावे. या काळात प्रवास करणे घातक ठरू शकते. तसेच जास्त वेळ बसून राहिल्याने किंवा एखादा झटका बसल्यास गर्भपाताचा धोका वाढतो.

तीन महिन्यांनंतरचा काळ
प्रेग्नन्सीच्या तीन ते सहा महिन्यांचा काळ प्रवास करण्यासाठी उत्तम आहे. या काळात तुम्ही प्रवास करू शकता. कारण या तीन महिन्यांत मळमळ आणि उलट्या होण्याची शक्यता कमी असते.

अशी घ्या काळजी: (गर्भधारणा प्रवासाच्या टिप्स)

  • जर तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय प्रवास करू नका.
  • प्रवासात तुमची सर्व औषधे आणि रिपोर्ट तुमच्यासोबत ठेवा.
  • तुमची सीट आरामदायी असावी
  • प्रवास करताना जास्त वेळ एकाच ठिकाणी बसणे टाळा. ब्रेक घेऊन प्रवास करावा.

बेबीमूनही करू शकता प्लॅन
आजकाल बेबीमूनचा ट्रेंड देखील वाढत आहे. हनिमूनप्रमाणेच बेबीमून प्लॅन केले जाते. बाळाच्या जन्मानंतर बराच काळ प्रवास करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यापूर्वी ट्रिप प्लॅन केली जाते. तज्ञांच्या मते, प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या ते सातव्या महिन्यांचा काळ बेबीमूनसाठी योग्य आहे. या काळात प्रवास करणे खूप सुरक्षित आहे.

Comments are closed.