Winter Travel : ऑक्टोबरमध्ये एक्सप्लोर करा ही ठिकाणे
दिवाळी 18 ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. शाळा-कॉलेजला या दिवसात सुट्टी असल्याने ऑक्टोबरमध्ये फिरण्याचे प्लॅन सुरू होतात. ऑक्टोबर महिन्यात गुलाबी थंडी पडायला सुरूवात होते. अशा वातावरणात फिरण्याची मज्जाच काही और असते. त्यामुळे अनेकजण दिवाळी झाल्यावर 4 ते 5 दिवस फिरण्याचा प्लॅन करतात. तुमचा सुद्धा ऑक्टोबरमध्ये फिरण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला तर मग जाणून घेऊयात अशी ठिकाणे जी गुलाबी थंडीत फिरण्यासाठी उत्तम आहेत.
केरळ –
केरळमधील उत्तर पूर्व भागात असलेलं वायनाड शहर अद्भूत निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. या ठिकाणचे वैशिष्ट्य पाहायचे झाल्यास येथे असणारे जंगल 3000 वर्षे जुने आहे. तुम्हाला शांतता हवी असेल तर येथे नक्की जा.
सिक्किम –
तुम्हाला बर्फाच्छादित टेकड्या आणि दऱ्यांनी वेढलेले निसर्गसौंदर्य अनुभवायचे असेल तर सिक्किम उत्तम पर्याय आहे. थंगू व्हॅली, चोप्टा व्हॅली आदी ठिकाणे येथे पाहण्यासारखे आहेत.
हेही वाचा – लाल, पिवळा तर कधी जांभळा.. सरड्यासारखा रंग बदलणारा डोंगर
ताजमहाल –
तुम्ही ताजमहाल पाहायला जाऊ शकता. ऑक्टोबरमध्ये एक्सप्लोर करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. आग्र्यातील ताजमहाल व्यतिरिक्त आग्रा किल्ला, मेहताब बाग, जामास मशीद आदी ठिकाणे पाहता येतील.
थार वाळवंट –
राजस्थानची सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाणारे जैसलमेर हे त्याच्या थारच्या वाळवंटासाठी ओळखले जाते. जर तुम्ही राजस्थानला भेट देत असाल तर तुम्ही येथे जायलाच हवे. तसेच या ठिकाणी रात्री लोकनृत्य सादर केले जाते, जो एक संस्मरणीय अनुभव तुम्हाला घेता येईल.
कालिंपोंग –
पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या पायथ्याशी कालिम्पोंग ठिकाण आहे. येथे दूरदूरवर पसरलेले हिरवेगार चहाचे मळे तुम्हाला पाहता येतील.
बांधवगढ नॅशनल पार्क –
जर तुम्ही फॅमिली पिकनिकसाठी निघाला असाल तर मुलांना मध्यप्रदेशमधील बांधवगढ नॅशनल पार्क येथे घेऊन जा. येथे जंगलातील वाघ, हत्ती, सिंह असे वन्य प्राणी पाहता येतील.
हेही पाहा – Pregnancy Travel Tips: प्रेग्नन्सीच्या काळात ट्रॅव्हल करावं का? जाणून घ्या सर्व काही
Comments are closed.