Cough Syrup : लहान मुलांना कफ सिरप द्यावे का? काय सांगतात बालरोगतज्ज्ञ
ऊन-पावसाच्या लपंडावामुळे हवामानात बदल होत आहेत. अशा बदलत्या हवामानात मुलांना लगेच सर्दी आणि खोकल्यासारखे आजार होतात. लहान मुलांच्या आरोग्यावर तर बदलत्या हवामानाचा लगेच परिणाम होतो. अशा वेळी आराम मिळण्यासाठी कफ सिरप दिले जाते. पण, सध्या कफ सिरपमुळे सर्व पालकांच्या मनात भीती बसली आहे. कारण राजस्थान आणि मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे झालेला लहान मुलांचा मृत्यू. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये झालेला लहान मुलांचा मृत्यू. त्यामुळे आता केंद्र सरकारने काही कफ सिरपवर बंदी घालण्यास सांगितली आहे. तसेच कमी वयाच्या मुलांना देताना काळजी घ्यावी यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. पाहूयात, याबद्दल बालरोगतज्ज्ञांनी सांगितलेला महत्त्वाचा सल्ला
मुलांना कफ सिरप केव्हा द्यावे?
बालरोगतज्ज्ञांच्या मते, सर्दी-खोकला हे वायरल इन्फेक्शन आहे. हे 5 ते 7 दिवसांत स्वतःहून बरे होऊ शकते. त्यामुळे यावर एंटीबायोटिक्स घ्यायल्याच हवेत असे नाही. बरेचजण सरसकट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारे ‘ओवर दी काउंटर’ सिरप घेतात. पण, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ओवर द काउंटर सिरप घेणे टाळायला हवे. वायरल इन्फेक्शनवर घरगुती उपाय करता येतात. जसे की, गरम पाणी पिणे, मीठाच्या गुळण्या करणे. खोकल्याचे जसे सुका आणि ओला असे प्रकार आहेत तसेच कफ सिरपचे सुद्धा प्रकार आहेत. अनेकदा आपण त्यातील घटक न पाहता सरसकट सिरप मुलांना देतो. ज्याच्या त्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा – मासिक पाळी नियमित तर सगळे आजार दूर, स्त्रीरोगतज्ञांचा इशारा
ओवर द काउंटर सिरप म्हणजे काय?
ओव्हर द काउंटर (OTC) सिरप म्हणजे असे सिरप जे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय फार्मसी आणि इतर दुकानांमध्ये विकले जातात. हे औषधे सहज उपलब्ध असली तरी, ते वापरताना लेबलवरील सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे आणि कोणत्याही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ओवर द काउंटर सिरपचे मुलांवर होणारे परिणाम –
- जास्त प्रमाणात झोप
- बेशुद्ध होणे
- श्वास घेण्यास अडचण
- उलटी आणि चक्कर
- जीवावर बेतण्याचा धोका
पौंढावर होणारे परिणाम –
- जास्त प्रमाणात झोप
- झोपेमुळे ड्रायव्हिंग करण्यास अडचण
- शरीरावर विविध प्रकारचे साइड इफेक्ट्स
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?
- बालरोगतज्ज्ञांच्या मते, कफ सिरपमध्ये डेक्सट्रोमेथोर्फनसारखे हानिकारक पदार्थ असतात, जे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हानिकारक असतात.
- कफ सिरप बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांचा मुलांच्या हृदयावर आणि मूत्रपिंडांवर परिणाम होतो, हे लक्षात घ्यावे. त्यामुळे, असे सिरप 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नयेत.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेच औषध मुलांना देऊ नये.
हेही वाचा – रात्री वायफाय सुरु ठेवून झोपता? वाचा काय होतात परिणाम
Comments are closed.