Silk Clothes: सिल्कचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवावेत का? जाणून घ्या योग्य पद्धत

सिल्कचे कापड हे नाजूक आणि मौल्यवान असते. यामुळे या कपड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. हे कपडे धुताना देखील योग्य खबरदारी न बाळगल्यास कपड्यांची चमक कमी होऊ शकते. यामुळे सिल्कचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवावेत का? ते धुण्याची योग्य पद्धत कोणती? आपण जाणून घेऊया…( How to wash silk clothes at home )

सिल्कचे कपडे धुताना काही सोप्या गोष्टी पाळल्यास, हे कपडे वर्षानुवर्षे नवीन दिसतात. सिल्कचे कपडे कधीही मशीनमध्ये धुवू नये. हे कपडे हाताने धुवावे. तसेच हे करताना पाण्यात सौम्य डिटर्जंट किंवा व्हिनेगरचा वापर करावा.

हे कपडे धुण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवावे. धुताना या कपड्यांना ब्रश लावू नये.

सिल्कचे कपडे धुताना नेहमी थंड पाण्याचा वापर करावा.

हे महत्त्वाचे:

हे कपडे धुताना सौम्य, pH-संतुलित डिटर्जंट वापरावे.

हे कपडे धुण्यासाठी कधीही ब्लीच किंवा रासायनिक डिटर्जंट वापरू नका.

एंजाइम असलेले डिटर्जंटमुळे देखील सिल्कच्या कपड्यांचे नुकसान होऊ शकते.

तसेच गरम पाण्यात हे कपडे धुतल्यास ते आकसतात.

सिल्कचे कपडे कसे सुकवायचे?

  • हे कपडे कधीही थेट सूर्यप्रकाशात वाळवू नयेत; यामुळे कपड्यांचा रंग फिकट होऊ शकतो.
  • हे कपडे उलटे करून सामान्य वातावरणात वाळवावे.
  • या कपड्यांना थेट इस्त्री करू नये. इस्त्री करण्यासाठी कपड्यांवर सुती कापड ठेवून मग इस्त्री करावी.

Comments are closed.