दिवाळी: दिवाळी हा यावर उपाय आहे, लक्ष्मी देवी येल
हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीला ‘दिपावली’ असेही म्हणतात. असे सांगितले जाते की, या दिवशी भगवान राम चौदा वर्षांचा वनवास भोगून अयोध्येत परतले होते. त्यामुळे हा आनंदा साजरा करण्यासाठी सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात आली. तसेच असेही सांगितले जाते की, या दिवसात लक्ष्मी देवी आणि श्री गणेश पृथ्वीवर राहायला येतात. त्यामुळे काही गोष्टी करणे अशुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात दिवाळीत कोणती कामे करू नयेत आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणते उपाय करता येतील.
आवर्जून करा ही कामे –
- दिवाळीत लक्ष्मी देवीचे घरी आगमन होण्यासाठी घराची साफसफाई करावी. कारण जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी देवी असते असे सांगितले जाते.
- नरक चतुर्दशीला ब्रम्ह मुहूर्तावर उठून तेल आणि उटण्याने अंघोळ करावी, यामुळे आरोग्य उत्तम राहते.
हेही वाचा – Diwali 2025: दिवाळीपूर्वी घराच्या ‘या’ दिशा स्वच्छ करणे गरजेचे; लक्ष्मी मातेचा राहील आशीर्वाद
- धनत्रयोदशीला संध्याकाळी घराच्या बाहेर आणि आत विशेष करून दक्षिण दिशेला दिवा लावावा. या उपायामुळे अकाली मृत्यूचे सावट असेल तर दूर होते.
- झाडू, सोने, चांदी आणि पितळेची भांडी धनत्रयोदशीला खरेदी करावीत. या उपायाने धनात वाढ होते.
- या दिवसात कोणालाही शिव्या – शाप देऊ नयेत.
- देवाची भक्ती या दिवसात करावी. मंत्र पठण, ग्रंथपठण करता येईल.
चुकूनही करु नका ही कामे –
- दिवाळीत तामसिक अन्नापासून दूर राहावे.
- दिवाळीत काळे रंगाचे कपडे घालू नयेत.
- टोकदार, धारदार वस्तू जसे की, चाकू, सुरी अशा वस्तू दिवाळीत खरेदी करू नयेत.
- शब्दांवर नियंत्रण असावेत. या दिवसात मोठ्यांचा अवमान करू नये.
- घरात शांतता राखावी. कोणत्याही प्रकारचे वाद घालू नयेत.
- दिवाळीत सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी झोपू नये. या वेळी पूजापाठ करावी, असे करणे शुभतेचे लक्षण सांगितले जाते.
हेही वाचा – Diwali 2025: वसुबारस ते भाऊबीज जाणून घ्या पूजेचे मुर्हूत आणि सर्व काही
Comments are closed.