Alia Bhatt: आलिया भट्टचा ‘हा’ फेव्हरेट पदार्थ ठरतो आरोग्यासाठी बेस्ट; पोटाच्या समस्या होतात दूर

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अनेकदा मुलाखतींमध्ये तिचे कम्फर्ट फूड कोणते हे सांगितले आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की साधा, सात्विक पदार्थ म्हंटला जाणारा दही भात हा आलिया भट्टला खूप आवडतो. तज्ञांच्या मते, दही भात हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. तुम्हाला आठवत असेल तर आपल्या घरातील आजी- आजोबा हे रोज जेवणानंतर थोडा दही भात खायचे. कारण नियमितपणे दही भात खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

तज्ञांच्या मते, दही भात हा आतड्यांसाठी खूप फायदेशीर असतो. दही भातामुळे शरीराला प्रोबायोटिक्स मिळतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. दही भातामुळे छातीत जळजळ, अ‍ॅसिडिटी कमी होते.

वजन कमी करण्यासाठी दही-भात हा उत्तम पर्याय आहे. तसेच दही – भात खाल्ल्याने मासिक पाळीपूर्वी पोटात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.

दही भातामुळे शरीराला कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी१२ मिळते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

याशिवाय दही भातामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दह्यातील असणारे प्रोबायोटिक्स तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत करते आणि शरीराला अनेक आजारांपासून लढण्यापासून सक्षम बनविते. तसेच दह्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळते. तसेच तुमचा मूड अधिक चांगला राहतो.

दही भातामुळे शरीरातील उष्णता कमी होते. गरम अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही सर्वात शेवटी दही भात खावा, ज्यामुळे पोटात जळजळ होत नाही आणि पोट शांत राहण्यास मदत मिळते. शिवाय तुम्ही जर अँटीबायोटिक्सचा डोस घेत असाल तर दही भात खावा.

Comments are closed.