Relationship: नवरा- बायकोने एकमेकांना देऊ नयेत ‘हे’ गिफ्ट्स’; नात्यात येईल दुरावा

नात्यामध्ये एकमेकांना भेटवस्तू देणे महत्त्वाचे मानले जाते. यामुळे जोडीदाराला आनंद होतो आणि नात्यातील गोडवा वाढतो. वाढदिवस किंवा कोणत्याही चांगल्या प्रसंगी नवरा- बायको एकमेकांना गिफ्ट्स देत असतात. पण तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, नवरा- बायकोने एकमेकांना काही वस्तू गिफ्ट म्हणून देणे अशुभ मानले जाते. असे म्हणतात या वस्तू एकमेकांना दिल्याने नात्यात दुरावा येतो.

कामगिरी
परफ्युम हमखास नवरा- बायको एकमेकांना गिफ्ट करत असतात. एकमेकांना परफ्युम देणे हे रोमँटिक वाटत असले तरी नात्यासाठी हे घातक ठरू शकते. असे म्हणतात की जोडीदाराला परफ्युम गिफ्ट केल्याने नाते बिघडते.

काळ्या रंगाच्या वस्तू
काळा रंग हा शुभ मानला जातो. त्यामुळे नवरा- बायकोने एकमेकांना काळ्या रंगांच्या वस्तू भेट म्हणून देणे टाळावे. काळा रंग हा शनि ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम नात्यावर होऊ शकतात.

रूमाल आणि घड्याळ
अनेकदा रूमाल आणि घड्याळ हे नवरा- बायको एकमेकांना देत असतात. पण असे म्हणतात की या भेटवस्तू देणे म्हणजे वाईट काळाची सुरुवात असते.

बूट आणि चप्पल
जोडीदाराला बूट आणि चप्पल भेट देणे टाळावे. बूट आणि चप्पल एकमेकांना दिल्याने नात्यात दुरावा येतो असे म्हणतात.

या भेटवस्तू देणे ठरते शुभ

  • तुम्हाला जर तुमच्या जोडीदाराला गिफ्ट घ्यायचा असेल तर तुम्ही परफ्युमऐवजी अत्तर भेट देऊ शकता.
  • सोने किंवा चांदीच्या वस्तू एकमेकांना भेट देऊ शकता.
  • जर तुमच्या पार्टनरला वाचनाची आवड असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला एखादे पुस्तक भेट देऊ शकता.
  • याशिवाय तुम्ही लॉंग ड्राइव्ह, डिनर डेट आणि मुव्ही डेट प्लॅन करू शकता.

Comments are closed.