Diwali 2025: जगभरातील ‘या’ देशांत असते दिवाळीची धूम; अशी करतात साजरी
दिवाळी सण आनंदाचा, उत्साहाचा आणि घरोघरी प्रकाशाचे दिवे उजळून अंधाराला दूर करण्याचा सण आहे. हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीला ‘दिपावली’ असेही म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का? केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशात मोठ्या धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली जाते. ते देश कोणते आपण जाणून घेऊया…
नेपाळ
भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये दिवाळी साजरी केली जाते. इथे दिवाळीला ‘स्वांती’ असे म्हंटले जाते. पाच दिवस हा सण इथे साजरा केला जातो. पहिल्या दिवशी कावळ्याची पूजा केली जाते, तर दुसऱ्या दिवशी कुत्र्यांना खाऊ घालण्याची प्रथा आहे. तिसऱ्या दिवशी गोमातेची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते. त्यानंतर पाचव्या दिवशी भाऊबीजप्रमाणे भाऊ टीका साजरी करतात.
श्रीलंका
श्रीलंकेत दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी तमिळ समाजातील लोक तेलाने स्नान करतात, नवीन कपडे घालतात आणि पोसाई म्हणजेच पूजा करतात.
मलेशिया
मलेशियामध्येही दिवाळीचा सण साजरा केला जातो. इथे हिंदू सौर कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात दिवाळी साजरी केली जाते. हिंदू धर्माचे लोक या दिवशी मंदिरात जाऊन उत्सव साजरा करतात.
थायलंड
थायलंडमध्येही दिवाळी साजरी केली जाते. इथे दिवाळीला लाम क्र्योंग म्हणतात. इथे केळीच्या पानांपासून दिवे बनवण्याची प्रथा आहे. रात्री दिव्यांनी शहर उजळून निघते आणि दिवा पाण्यात वाहून टाकला जातो.
Comments are closed.