Cancer : उपचारानंतर पुन्हा कॅन्सर होऊ शकतो का? तज्ज्ञ काय सांगतात?
‘महाभारत’ या मालिकेत कर्णची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते पंकज धीर यांचं बुधवारी (15 ऑक्टोबर 2025) निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कर्णच्या भूमिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. गेल्या काही वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. पण, काल (15 ऑक्टोबर 2025) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्यामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर पंकज धीर यांना पुन्हा कॅन्सर झाल्याचे समोर आले. अनेकदा कॅन्सर रुग्णांमध्ये असं घडतं. उपचार केल्यानंतर कॅन्सर बरा होतो आणि पुन्हा काही वर्षांनी उद्भवतो. यावर तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊयात
पुन्हा कॅन्सर होऊ शकतो का?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार काही वेळा शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा केमोथेरेपेनंतरही काही पेशी शरीरात लपून राहतात आणि कालांतराने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत झाल्याने पेशी पुन्हा शरीरात ऍक्टिव्ह होतात आणि कॅन्सर पुन्हा होतो.
हेही वाचा – रात्री भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?
कॅन्सर पुन्हा कधी होऊ शकतो?
एकदा कॅन्सरवर उपचार झाल्यानंतर कॅन्सर पुन्हा काही महिन्यांनंतर परत डोकंवर काढू शकतो. डॉक्टरांनी याचे तीन भागांमध्ये विभाजन केलं आहे. लोकल रीकरेन्स म्हणजे – त्याच जागी पुन्हा कॅन्सर होणे, रीजनल रीकरेन्स – जवळच्या लिम्फ नोड्समध्ये पसरणे आणि डिस्टेंट रीकरेन्स – शरीराच्या इतर भागांमध्ये पसरणे.
कॅन्सरला शरीरापासून कसे दूर ठेवाल?
- धुम्रपान आणि तंबाखूपासून दूर राहा.
- फळे, भाज्या आणि फायबरयुक्त आहार घ्या.
- नियमित व्यायाम करा.
- वजनावर नियंत्रण मिळवा.
- स्ट्रेसपासून दूर राहा.
- पुरेशी झोप घ्या.
हेही वाचा – Alia Bhatt: आलिया भट्टचा ‘हा’ फेव्हरेट पदार्थ ठरतो आरोग्यासाठी बेस्ट; पोटाच्या समस्या होतात दूर
Comments are closed.