Beauty Tips: निरोगी त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय; चेहऱ्यावर येईल इंस्टंट ग्लो

निरोगी त्वचा ही सर्वांना हवीच असते. यासाठी अनेकदा महिला बाजारातील महागडी उत्पादने वापरतात. पण तरीही हवा तसा परिणाम दिसत नाही. शिवाय त्वचेवर काही रिऍक्शन होण्याचा धोका असतो. मग अशा वेळी तुम्ही घरी असलेले काही घटक वापरून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. हे सर्व घटक अत्यंत नैसर्गिक असतात आणि त्यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. शिवाय या घटकांच्या औषधी गुणधर्मामुळे त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

धकाधकीची जीवनशैली, धूळ- प्रदूषण, सूर्यप्रकाश, हार्मोन्समधील बदल यामुळे अनेकदा चेहऱ्यावर पिंपल्स, मुरुमे आणि डाग पडतात. परिणामी आपण त्यावर बाजारातील प्रोडक्ट्स वापरतो, मात्र त्यामध्ये कधीकधी खूप जास्त प्रमाणांत केमिकल्स वापरलेले असतात, ज्यामुळे त्वचेचे मोठं नुकसान होतं. यासाठी कोणते घटक वापरून आपण घरच्या घरी स्किनकेअर करू शकतो ते जाणून घेऊया…

लिंबू आणि मध
लिंबू आणि मधाचे मिश्रण त्वचेसाठी फायदेशीर ठरते. लिंबू नैसर्गिक ब्लीचसारखे काम करते, तर मध त्वचेला ओलावा आणि मऊपणा देतो. त्यामुळे एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे काळे डाग नाहीसे होतील.

कोरफडीचे जेल
कोरफडीचे जेल हे तर त्वचेसाठी रामबाण उपाय आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे दररोज चेहऱ्याला कोरफडीचे जेल लावावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते, चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.

दही आणि हळद
हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यात असलेल्या अँटीऑक्सीडंट्समुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात, दह्यामुळे टॅनिंग कमी होते. त्यामुळे दही आणि हळदीची पेस्ट चेहऱ्यावर लावावी यामुळे त्वचा उजळते.

बेसन, गुलाब पाणी
बेसन त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. बेसनामध्ये गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचा उजळते, आणि अनेक समस्यांपासून आराम मिळतो. हे काही घरगुती उपाय तुम्ही आठवड्यातून २ वेळा केले तर तुमची त्वचा निरोगी राहते.

Comments are closed.