Diwali Padwa: पती-पत्नीने एकमेकांना द्यावेत हे गिफ्ट, पाडवा होईल स्पेशल
दिवाळी पाडवा म्हणजे नवरा-बायकोच्या नात्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. पाडव्याला पत्नी पतीस अभ्यंगस्नान घालते आणि त्याचे औक्षण करते. पतीला उदंड आयुष्य लाभावे यासाठी देवाकडे प्रार्थना करते. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. नवरा आपल्या घरातील लक्ष्मीला आजच्या दिवशी भेटवस्तू देतो. तुम्हाला देखील पत्नीला भेटवस्तु द्यायची आहे पण काय द्यावं हे समजत नाहीये. तर, आज आम्ही तुम्हाला काही भेटवस्तूचे असे काही ऑपश्न सांगणार आहोत ज्याचा कोणीही विचार करणार नाही.
- कौतूक ऐकायला कोणाला आवडत नाही. कौतुकाचे दोन शब्द ऐकण्यासाठी प्रत्येकाचेच कान टवकारलेले असतात. या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तापासून आपल्या जोडीदाराचे भरभरून कौतूक करण्यास सुरूवात करा आणि बघा दोघांमधील प्रेम आणखी वृद्धीगंत होण्यास मदत होईल.
- अनेक कपल्समध्ये चुकीच्या गोष्टीचे खापर एकमेकांवर फोडायची सवय असते. पण, दोघांनीही एकमेकांना दोष न देता त्या घटनेची जबाबदारी स्वीकारून पुढे जाण्याचे वचन या पाडव्याला एकमेकांना द्यावे. यामुळे दोघांतील वाद कमी होतील.
- सोशल मीडियामुळे प्रत्येकजण स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याची इतरांसोबत तुलना करत आहे. पण, यामुळे अनेकांचा सुखी संसार उद्भस्त देखील होत आहे. अशा परिस्थितीत यावर्षीच्या पाडव्यापासून सोशल मीडियापासून अंतर राखून एकमेकांना वेळ देण्याचे, दोघांतील प्रेमाची तुलना न करण्याचे वचन द्या.
- हल्लीच्या जगात वेळ ही गोष्ट फार मौल्यवान झाली आहे. नात्यातला नवेपणा किंवा फ्रेशनेस टिकवायचा असेल तर एकमेकांना वेळ नक्की द्या. पाडव्याच्या स्पेशल दिवशी पत्नीसाठी एक खास रॉमेंटिक डिनर डेट प्लान करु शकता. जिथे तुम्ही दोघे एकमेकांना वेळ देऊ शकाल. शक्य असेल तर एक लहानशी हॉलिडे प्लॅन करा, जिथे तुम्ही दोघे एकत्र वेळ घालवू शकाल.
हेही वाचा – Diwali Wishes : दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा
Comments are closed.