दिवाळीत डायबिटीज आणि बीपीच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, आणि आतिषबाजीबरोबरच गोडाधोडाचा सण. यामुळे या दिवसात तेलकट, तुपकट, गोड पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण जर तुम्हाला डायबिटीज, बीपी यांपैकी कोणतीही व्याधी असेल किंवा दोन्ही व्याधी असतील तर मात्र तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे. कारण दिवाळीचे काही क्षण एन्जॉय करताना आनंदाच्या भरात खाल्लेले अतिगोड पदार्थ दिवाळीची मजाच घालवू शकतात.
कारण या दिवसात सगळेजण डाएट करणे टाळतात. पण जर तुमच्या खाण्यात अति तेलकट,तुपकट, गोड, खारट असलेले पदार्थ जास्त प्रमाणात आले तर ब्लड प्रेशर अचानक वाढणे, शुगर वाढणे ,शरीराला सूज येणे, झोप न लागणे असा त्रास सुरू होतो. त्यातच दिवाळीत सगळे कुटुंबच एकत्रित येत असल्याने रात्री गप्पाटप्पा करत जागरण केले जाते. जे डायबिटीज आणि बीपी रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते. तसेच यादिवसात सगळेचजण उत्साहात असल्याने बऱ्याचवेळा औषध, गोळ्यांचा विसर पडतो. यासगळ्यांचा परिणाम शरीरावर होतो. दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे हवेत प्रदूषण वाढते. परिणामी श्वसनाचे विकार यादिवसात बळावतात. यामुळे दिवाळी साजरी करतानाही अलर्ट राहावे. त्यासाठी काय खबरदारी घ्यावी ते बघूया.
कितीही धावपळ असली तरी औषधे वेळेवर घ्यावी
मुबलक पाणी प्यावे
जागरण टाळावे
थकवा, तणाव येणारी कामे टाळावीत.
दररोज शुगर, बीपी चेक करावे
हलका व्यायाम, योग करावा,
Comments are closed.