Bhaidooj Gift Ideas : भावा-बहिणीला भाऊबीजेला द्या हे युनिक गिफ्ट्स
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. या वर्षी भाऊबीज 23
ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. भाऊबीज सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते आणि आरती ओवाळते. तसेच त्याचा दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. दिवाळीतला भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, यंदा भाऊबीजेला आपल्या बहिणीला किंवा भावाला काय खास भेटवस्तू द्यावी असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.
- यंदा तुमचे बजेट जास्त असेल तर तुम्ही भावाला किंवा बहिणीला सोन्या-चांदीचे दागिने किंवा नाणे देऊ शकता. या भेटवस्तूने नक्कीच यंदाची दिवाळी खास होईल.
हेही वाचा – Diwali : दिवाळी पार्टीसाठी पुरुषांनी व्हावे असे तयार, दिसाल क्लासी
- तुमच्या भावाला किंवा बहिणीला घड्याळ घालण्याची आवड असेल तर त्यांना छान घड्याळ गिफ्ट करा. हल्ली डिजीटल वॉच ट्रेडिंगमध्ये आहे ते तुम्ही देऊ शकता.
- लहान भाऊ किंवा बहिण असतील भाऊबीजेच्या गिफ्टिंगसाठी
कपडे देऊ शकता. - तुमच्या भावाला किंवा बहिणीला वाचणाची आवड असेल तर त्यांना छान पुस्तक भेट म्हणून द्या.
- बहिणीला एक छान स्कीनकेअर किंवा ब्युटी हॅम्पर गिफ्ट करू शकता. यात फेस वॉश, मॉइश्चरायझर, फेस मास्क आणि परफ्यूमचा समावेश असू शकतो.
- धावपळीच्या जगात बरेच आजार मानवाला होत आहेत. अशावेळी तुम्ही तुमच्या बहिणीच्या नावे आरोग्य विमा काढू शकता. यंदाच्या दिवाळीत बहिणीसाठी आरोग्य विम्याचे हे गिफ्ट सर्वात बेस्ट ठरेल.
हेही वाचा – दिवाळीत फटाके फोडताना भाजलात? घाबरू नका, घरच्या घरी करा हे सोपे प्रथमोपचार
Comments are closed.