Religious : हिंदू धर्मात स्वस्तिक काढण्याला विशेष महत्व का आहे?

हिंदू धर्मात स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभप्रतीक मानले जाते. स्वस्तिकचा सुचक अर्थ ‘कल्याण असो’ असा असल्यामुळे कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला हे चिन्ह रेखाटले जाते. यामध्ये सूर्य, इंद्र, वायु, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रम्हदेव, शिवपार्वती, श्रीगणेश अशा अनेक देवतांचा समावेश असतो. त्यामुळे स्वस्तिक काढण्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. (Religious Education making swastik on the special occasion why so important in Hinduism)

अनेक पूजा स्वस्तिक चिन्ह रेखाटल्याशिवाय सुरू होत नाहीत. स्वस्तिक हे केवळ चिन्ह नसून हे सौभाग्याचे सूचक मानले गेले आहे. अध्यात्मिकदृष्ट्या, ऋषींनी शुभ वातावरण निर्मितीसाठी आणि जीवनात आनंद भरण्यासाठी अनेक चिन्हे निर्माण केली. यापैकी एक म्हणजे स्वस्तिक. हिंदू धर्मग्रंथांमध्ये या चिन्हाला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीशी जोडले आहे. चंदन, कुमकुम किंवा सिंदूर लावून स्वस्तिक तयार केल्यास ग्रह दोष निवारण होते, धनलाभाचे योग बनतात आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.

स्वस्तिकचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही दिशेला तयार केल्यास सकारात्मक ऊर्जा 100 पटीने वाढते. मात्र, हे चिन्ह बनवण्याची एक खास पद्धत आहे. ऋग्वेदात सांगितल्याप्रमाणे, स्वस्तिक सूर्याच्या ऊर्जेचे प्रतीक असून त्याच्या चार दिशा आहेत. ज्यामूळे हे सर्वत्र सकारात्मकता प्रवाहित करण्याचे कार्य करते. त्यामुळे हे चिन्ह योग्य मार्गाने आणि योग्य दिशेने तयार करणे महत्वाचे आहे.

स्वस्तिक बनवण्याची योग्य पद्धत

ज्योतिष शास्त्रानुसार, स्वस्तिक बनवताना त्याच्या रेखा ओलांडून बनवू नये. स्वस्तिकाची मध्य बाजू अर्धी रेखाटून उजव्या बाजूने पुढील स्वस्तिक पूर्ण करावे. धर्म, अर्थ, काम, मोक्षसंबंधित रेखा आखल्यावर सालोक्य, सामीप्य, सारुप्य आणि सायुज्य रेखा पूर्ण कराव्या. पुढे मन, बुद्धी, अहंकार आणि चेतनारुपी स्वस्तिकचे वळण पूर्ण करावे. शेवटी श्रद्धा, विश्वास, प्रेम, समर्पण दर्शवणारे बिंदू तयार करावे. अशा प्रकारे बनवलेले स्वस्तिक शुभ मानले जाते.

हेही वाचा –

Diwali Bhaubeej 2025 : भाऊबीजेला मंगल औक्षण का करतात?

Comments are closed.