Thackeray Bhaubeej Photos : तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधूंची भाऊबीज एकत्र, पहा हे क्षणचित्रे
मुंबई : गुरुवारी (23 ऑक्टोबर) देशभरात भाऊबीज उत्साहात साजरी होत आहे. हा सण भावाबहिणीच्या प्रेम आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2004 नंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे जयजयवंती ठाकरे यांच्या घरी भाऊबीजेसाठी उपस्थित होते. यापूर्वी दरवर्षी फक्त राज ठाकरेच त्यांच्या घरी भाऊबीज साजरी करत असत. या कौटुंबिक सोहळ्यात संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आले होते.
Comments are closed.