Body Detox : गोड आणि तेलकट खाऊन शरीर जड झालंय? असं करा शरीर डिटॉक्स

दिवाळीत फराळ, मिठाई खाण्यात येते. घराघरांत फराळाचा सुगंध पसरतो. काही वेळा तर सणानिमित्ताने एकत्र आलेले नातेवाईक घरी आल्याने फराळासोबत जंकफूड असे अस्वाथ्यकर पदार्थ खाल्ले जातात. पण, अशा पदार्थामुळे शरीराचे स्वास्थ बिघडते. जास्त तळेलेले पदार्थ आणि मिठाई खाल्यामुळे शरीरात एक प्रकारचा आळस येतो आणि थकवा जाणवतो.अशा वेळी शरीराला थोडंसं डिटॉक्स करण्याची गरज असते. शरीर डिटॉक्स केल्याने शरीरातील जडपणा कमी होतो. चला तर मग जाणून घेऊयात दिवाळीनंतरचं बॉडी डिटॉक्स

लिंबू सरबत –

दिवाळीनंतर बॉडी डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध टाकून प्यावे. हे पेय शरीरात विषारी घटक बाहेर काढते आणि पचनसंस्था सुरळीत करते.

साखर खाऊ नका –

मिठाई साखरेशिवाय अपूर्ण असते. दिवाळीत तर खूप जास्त प्रमाणात मिठाई खाल्ली जाते. अशावेळी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी दिवाळीनंतर दोन ते तीन आठवडे साखरेचे पदार्थ खाणे बंद करावेत.

हेही वाचा – Kidney Health: सकाळच्या या ५ सवयी हळूहळू खराब करतात किडनीचं आरोग्य

पाणी प्यावे –

बॉडी डिटॉक्ससाठी भरपूर पाणी प्यावे. यामुळे लघवीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतील.

फायबरयुक्त डाएट –

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी फायबर शरीरात जाणे आवश्यक आहे. यासाठी फायबरयुक्त पदार्थ, काकडी, गाजर, हिरव्या पालेभाज्या आणि फळे खावीत.

शरीर ऍक्टीव्ह ठेवा –

शरीरातील जडपणा घालवण्यासाठी शरीर ऍक्टीव्ह ठेवावे. हलका-फुलका व्यायाय, योगा, स्ट्रेचिंग करू शकता. यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि शरीरातील आळसपणा कमी होईल.

पूर्ण झोप घ्यावी –

सणामध्ये धावपळ आणि दगदग होते. परिणामी झोप पूर्ण होत नाही आणि संपूर्ण शरीराचे स्वास्थ बिघडते. त्यामुळे दिवाळीनंतर शरीराचे चक्र पूर्ववत होण्यासाठी पूर्ण झोप घ्यावी.

हेही वाचा – Erectile Dysfunction: पुरुषांच्या नपुंसकतेची कारणांमध्ये अपुऱ्या झोपेचा ही समावेश, वाचा तज्ञ काय सांगतात

Comments are closed.