दिवाळीनंतर वाढतंय प्रदूषण; फटाक्याच्या धुराने आरोग्यावर होतायत ‘हे’ गंभीर परिणाम, अशी घ्या काळजी

दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचा सण, पण फटाक्यांच्या आतेषबाजीनंतर हवेची गुणवत्ता मात्र झपाट्याने ढासळते आणि श्वास घेणंदेखील कठीण होऊ लागतं. दरवर्षी दिवाळीनंतर देशातील हवामानाचा अहवाल चिंताजनक असतो. दिवे विझल्यानंतर हवेतील धूर, रसायने आणि धूळ यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

दिवाळीनंतर प्रदूषण एवढं का वाढतं?
दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. या फटाक्यांमधून सल्फर, नायट्रोजन, जड धातू आणि सूक्ष्म कण हवेत पसरतात. हे कण हवेत दीर्घकाळ राहतात आणि आपल्या शरीरात श्वासावाटे प्रवेश करतात. यामुळे फुप्फुसांची क्षमता कमी होते आणि श्वसनाचे आजार वाढतात.

त्यातच या काळात उत्तर भारतात शेतीतील पराली जाळली जाते. तो धूर वाऱ्यासह इतर राज्यांतही पसरतो. हिवाळ्याची सुरुवात झाल्याने हवा खालीच अडकून राहते आणि प्रदूषण जमिनीलगतच अधिक दाट होतं. वाहनांची गर्दी आणि धूळ यामुळे परिस्थिती अजूनच गंभीर बनते.

फटाक्यांच्या धुरामुळे आर्पग्यावर होणारे परिणाम

श्वसनविकार वाढतात
दम्याचे रुग्ण, मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना या काळात श्वास घेण्यास त्रास होतो. फटाक्यांमधील सूक्ष्म धूलिकण फुप्फुसांमध्ये थेट पोहोचतात.

डोळ्यांचा त्रास
धूर आणि रसायनांमुळे डोळ्यांची जळजळ, पाणी येणे, लालसरपणा वाढतो.

हृदयविकाराचा धोका
फटाक्यांचा मोठा आवाज आणि धूर यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर ताण येतो.

कानाच्या पडद्यावर परिणाम
अत्यंत मोठा आवाज कानासाठी धोकादायक असतो. श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

त्वचेची अडचण
धूरातील रसायने त्वचेवर एलर्जी आणि खाज आणू शकतात.

प्रदूषणापासून स्वतःची कशी काळजी घ्यावी
तज्ज्ञ नसूनही आपल्या आरोग्यासाठी काही साध्या गोष्टी करणं आवश्यक आहे. बाहेर जाताना N95 मास्क वापरा. शक्यतो हा काळ घरात राहून काढा. खिडक्या, दरवाजे बंद ठेवा आणि हवा स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय करा. थंड हवेत पहाटे किंवा उशिरा व्यायाम टाळा. पुरेसे पाणी प्या, फळे-भाज्यांचा आहार वाढवा. आपल्या परिसरातील हवेची गुणवत्ता मोबाईल अॅप्सद्वारे तपासत राहा

प्रदूषण कमी करणे आपल्याच हातात
दिवाळीचा आनंद नक्की साजरा करा. पण आनंदानंतरचे परिणामही टाळायला हवेत. कमी प्रमाणात फटाके फोडणे, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे
फायद्याचे ठरेल.

Comments are closed.