Fashion Tips : उंची कमी? या ड्रेसिंग टिप्स करा फॉलो, दिसाल उंच

हल्ली दिवसाला भारतीय पोशाखांपासून ते वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत अनेक फॅशन ट्रेंड येत आहेत. सर्वांपेक्षा हटके आणि अट्राक्टिव्ह लूकसाठी हे फॅशन ट्रेंड फॉलो सुद्धा केले जातात. पण, आकर्षक लूकसाठी फक्त फॅशन ट्रेंड फॉलो न करता शरीराचा आकार आणि उंचीही लक्षात घेणे आवश्यक आहे. अनेकदा उंचीने कमी असणाऱ्या मुली केवळ हिल्स घालून उंची वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण, हे तुमच्या आकर्षक लूकसाठी पूर्ण नाही. हिल्ससोबत कपड्यांची योग्य निवड करणे आवश्यक आहे. जर तुमची उंची कमी असेल आणि तुम्हाला उंच दिसायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही आउटफिट आयडिया घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर केल्यास तुमची उंची वाढलेली दिसेल.

स्ट्रेट फिट पँट –

उंच दिसण्यासाठी स्ट्रेट फिट पँट वापरण्यास सुरुवात करावी. स्ट्रेट फिट पँट फॉर्मल शर्ट किंवा टॉप तुम्ही घालू शकता. यामुळे उंच दिसण्यास मदत होईल.

हेही वाचा – Beauty Tips: निरोगी त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय; चेहऱ्यावर येईल इंस्टंट ग्लो

हाय वेस्ट जीन्स –

एक-दोन हाय वेस्ट जीन्स खरेदी कराव्यात. यात शक्यतो निळा आणि काळा रंग निवडावा. या रंगामुळे पाय लांब दिसतात. ज्यामुळे तुम्ही उंच दिसता.

मोनोक्रोमॅटिक पोशाख –

मोनोक्रोम‍ॅटिक आउटफिट्समुळे उंची जास्त दिसते. त्यामुळे मोनोक्रॉमेटिक कपड्यांची खरेदी करावी. यात एकाच रंगाचे कपडे असतात. ज्यामध्ये टॉप आणि पँट अथवा किंवा सलवार एकाच रंगाची असते. एकाच रंगामुळे उंची जास्त दिसण्यास मदत होते.

व्हर्टिकल लाइन्स –

कमी उंची असूनही उंच दिसण्यासाठी व्हर्टिकल लाइन्स असणारे कपडे घालावेत. अशा पट्ट्यांचे कपडे तुम्हाला सडपातळ आणि उंच दिसण्यास मदत करतात.

शॉर्ट कुर्ती –

हल्ली कॉटन प्रिटेंड कुर्तीचा ट्रेंड आहे. तुम्ही पलाझो, जीन्स किंवा लूझ पँटसोबत शॉर्ट कुर्ती वेअर करू शकता. कॉलेज किंवा ऑफिससाठी हे ड्रेसिंग उत्तम आहे.

कंबर बेल्ट –

कंबर अधिक आकर्षक दिसण्यासाठी आणि उंची जास्त दिसण्यासाठी कंबरेला बेल्ट लावावे. यामुळे तुमच्या कमरेखालील भाग उंच दिसतो.

हेही वाचा – Beauty Tips: लेझर हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट कितपत सुरक्षित? जाणून घ्या तज्ञांचे मत

Comments are closed.