Relationship Tips : कुटूंबासोबत क्वालिटी टाइम का गरजेचा?
बिझी लाइफस्टाइलमध्ये स्वत:साठी वेळ काढणे अवघड झालंय तर कुटूंबातील व्यक्तींसाठी वेळ काढणे दूरचं राहिलंय. हल्ली कित्येकजण शिक्षण आणि कामाच्यानिमित्ताने घरापासून दूर राहत आहेत. ज्यामुळे कुटूंबासोबत फक्त फोनच्या माध्यमातून संपर्कात आहेत. अशावेळी तुम्ही कुटूंबासाठी थोडा वेळ काढायला हवा. कितीही बिझी शेड्यूल असले तरी थोडा वेळ कुटूंबासाठी, प्रिय व्यक्तीसाठी नक्की काढायला हवा. आज आपण जाणून घेऊयात कुटूंबासोबत वेळ घालवणे का गरजेचे आहे? यामुळे नात्यावर काय परिणाम होतो? आणि बिझी शेड्यूलमधून कसा वेळ काढता येईल.
हेही वाचा – Tall Poppy Syndrome: ‘टॉल पॉपी सिंड्रोम’ म्हणजे नेमकं काय? तुमच्या यशावर काहींना का चीड येते?
- तुम्हाला पूर्ण दिवस वेळ काढणे शक्य नसेल तर डिनर किंवा लंचचा प्लॅन करा. सलग सुट्ट्या येणार असतील तर घरी जाऊन या. आई-वडिलांना सरप्राइज द्या. यामुळे त्यांना सुखद धक्का देऊ शकता.
- जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा एकत्र जेवण करा. दिवसभरात तुमच्या ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये काय घडलं आहे, या गोष्टींबद्दल बोला. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील लहान-सहान गोष्टी कुटूंबाला कळतील.
- कुटूंबासोबत सुट्टीच्या दिवशी चित्रपट पाहू शकता किंवा वन डे पिकनिकचा प्लॅन आखू शकता. यामुळे तुमच्यातील बॉडिंग वाढेल.
- बैठे खेळ किंवा मैदानी खेळ एकत्र खेळणे, यामुळे तुमचा मूड सुधारेल आणि कुटूंबासोबत वेळही घालवला जाईल.
कुटुंबाला वेळ देण्याची गरज का आहे?
नातेसंबंध सुधारतात – एकत्र वेळ घालवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम आणि आपुलकी वाढते. एकमेकांना समजून घेण्यास मदत होते.
संवाद वाढतो – जेव्हा तुम्ही एकत्र वेळ घालवता तेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलू शकता, तुमचे अनुभव आणि दिवसातील गोष्टी शेअर करू शकता.
भावनिक आधार – कुटुंबात एकमेकांना भावनिक आधार मिळतो, कारण संकटाच्या वेळी हेच एकमेव आधारस्तंभ ठरतात.
वाद कमी होतात – वेळ न दिल्याने अनेक वेळा गैरसमज होतात आणि वाद निर्माण होतात. वेळ दिल्याने हे वाद टाळता येतात.
एकमेकांना समजून घेणे – एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – Health Tips: नैराश्य आणि चिंता यात फरक काय? ९९% लोकांना माहित नाही
Comments are closed.