E-cigarette Side Effects : ई- सिगरेट म्हणजे काय, तरुण पिढी का अडकतेय या सवयीमध्ये?

काळानुसार धूम्रपानाचं स्वरूप बदलत गेलं. बिडीपासून सिगारेट आणि आता ई-सिगारेट हा ट्रेंड वाढताना दिसतोय. धूर नाही, वास नाही, म्हणून अनेकांना हे आधुनिक, सुरक्षित पर्याय वाटतात. पण खरं पाहिलं तर या रंगीबेरंगी धुरामागे लपलेला धोका अधिक गंभीर आहे. (e cigarette side effects health risk)

ई-सिगारेट म्हणजे काय?
ई-सिगारेट हे बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. यात तंबाखू नसतो, मात्र निकोटीन, फ्लेवर्स आणि काही रसायन मिश्रित द्रव गरम केला जातो. त्यातून तयार होणारी वाफ श्वासावाटे आत घेतली जाते. या प्रक्रियेला व्हेपिंग म्हणतात. हे पेनसारखे, यूएसबी स्टिकसारखे किंवा पॉड-आधारित विविध प्रकारात उपलब्ध असतात.

ई-सिगारेट कमी धोकादायक वाटतात, पण का दिशाभूल होते?
पारंपारिक सिगारेटमध्ये तंबाखू जळतो, त्यातून टार आणि विषारी रसायने फुफ्फुसात जातात. ई-सिगारेटमध्ये तंबाखू जळत नसल्यामुळे लोकांना वाटतं “धूर नाही म्हणजे नुकसानही नाही.” पण ही चुकीची समजूत आहे.

खरं नुकसान कसं होतं?
वॅपिंगमध्ये जाणारे रसायने फुफ्फुसांवर परिणाम करतात आणि निकोटीनमुळे व्यसन जलद लागण्याचा धोका उद्भवतो हृदय आणि रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम
फ्लेवर्समध्ये असलेल्या रसायनांचा दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतो तर मेंदूच्या विकासात अडथळा येतो , विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये म्हणूनच ई-सिगारेटला “सुरक्षित सिगारेट” म्हणणं धोकादायक ठरतं.

तरुणांना जास्त आकर्षण का?
1) ट्रेंडी गॅजेटसारखी डिझाईन
२) विविध फ्लेवर्स उपलब्ध
3) धूर नसल्यामुळे पालकांना माहितही पडत नाही
4) सोशल मीडियाचा प्रभाव आणि याचमुळे निकोटीनचं व्यसन वाढण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते.

भारतासह अनेक देशांचा कठोर निर्णय
ई-सिगारेटमुळे तरुणांना व्यसन लागण्याचा वेग वाढतोय अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणूनच भारतासह अनेक देशांनी ई-सिगारेटची विक्री, जाहिरात आणि उत्पादनावर बंदी लागू केली आहे. धूर दिसत नाही म्हणून धोका नाही असं नाही. आरोग्याला लागलेलं व्यसन नेहमीच खोलवर नुकसान करून जातं.

(टीप: या लेखात दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. वाचकांनी आरोग्यविषयक निर्णय वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावेत.)

Comments are closed.