Patch Testing : स्किनकेअर, मेकअप प्रॉडक्ट वापरण्याआधी पॅच टेस्ट महत्त्वाची का?

हल्ली बाजारात विविध कंपन्यांचे, प्रकारचे स्किनकेअर मेकअप प्रॉडक्ट मिळतात. धावपळीच्या युगात स्किनकेअरसाठी वेळ नसल्याने बरेच जण बाजारातील हे प्रॉडक्ट वापरतात. महिलांसाठी महिन्यातून एकदा स्किनकेअर प्रॉडक्ट खरेदी करणे ही नॉर्मल गोष्ट आहे. अनेकदा मुली एकमेकींचे स्किनकेअर, मेकअप प्रॉडक्ट वापरतात. पण, नकळत यामुळे स्किन ऍलर्जी होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी त्वचारोगतज्ज्ञ कोणतेही स्किनकेअर, मेकअप प्रॉडक्ट वापरण्याआधी पॅट टेस्ट करण्याचा सल्ला देतात. पण, ही पॅच टेस्ट कशी करतात? त्यामुळे कोणते फायदे होतात? चला जाणून घेऊयात

पॅच टेस्ट –

एखाद्या व्यक्तीला स्किनकेअर आणि मेकअप प्रॉडक्टमधील घटकांची ऍलर्जी असू शकते. जसे की, त्यातील सुगंध, प्रिझर्व्हेटीव्हस किंवा विशिष्ट घटक. हे टाळण्यासाठी एखादे प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. पॅच टेस्ट केल्याने त्वचेवर लालसरपणा, खाज येणे, पुरळ उठणे अशा ऍलर्जिक रिएक्शन टाळता येतील. त्वचेच्या लहान भागावर प्रॉडक्ट लावून तुम्ही हे प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावू शकता की नाही याचा अंदाज घेऊ शकता.

हेही वाचा – Hair Fall : केस गळतीला कारण ठरतात हे पदार्थ

पॅच टेस्ट कशी करावी?

  • तुमच्या त्वचेच्या एका लहान आणि न दिसणाऱ्या भागावर (जसे की कानाच्या मागे किंवा हाताच्या आतील कोपरावर) कमी प्रमाणात प्रॉडक्ट लावावे. आता लावलेली क्रिम किंवा कोणतेही प्रॉडक्ट पूर्णपणे सुकू द्यावे.
    लावा.
  • साधारणपणे २४ ते ४८ तास वाट पाहणे आवश्यक आहे.
  • आता 24 तासांनंतर त्या भागाची तपासणी करावी.
  • जर लालसरपणा, खाज किंवा जळजळ झाली तर ते प्रॉडक्ट वापरू नका.
  • जर कोणतीही प्रतिक्रिया दिसली नाही, तर तुम्ही उत्पादन चेहऱ्यावर वापरू शकता.

हेही वाचा – Dry Shampoo : पाणी न वापरता केस करा स्वच्छ, काय आहे ड्राय शॅम्पू?

Comments are closed.