मुलं सतत दंगा करतात, शांत बसत नाहीत? असू शकतो हा आजार
मुलांना सांभाळणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही. पूर्वी एकत्र कुटूंब पद्धती असल्याने मुलांना सांभाळायला कोणी ना कोणी असायचं. पण, आता विभक्त कुटूंब असल्याने मुलांकडे लक्ष देणे हे फक्त आईवडीलांचे काम झाले आहे. त्यात जर मूल सतत दंगा करणारे, मस्तीखोर असेल तर आईवडीलांसाठी एक डोकेदुखीचं असते. दंगेखोर मुलांच्या गोष्टी पाहून मुलं लहान आहेत, मस्ती करणारचं असं म्हटलं जातं. पण, दरवेळी असे असेलच असं नाही. बालरोगतज्ज्ञांच्या मते, मुलं अशी वागण्यामागे आजार असू शकतो असे सांगितले जात आहे. ज्याला वैज्ज्ञकिय भाषेत ‘अटेंशन डेफिसिट हायपरऍक्टिव्ह डिसॉर्डर’ असे नाव देण्यात आले आहे. काय आहेत याची लक्षणे जाणून घेऊयात
लक्ष तूट अतिक्रियाशील विकार
अटेंशन डेफिसिट हायपरऍक्टिव्ह डिसॉर्डर ही एक वर्तवणूकीशी संबंधित अवस्था असते. विशेष करून ही लहान मुलांमध्ये आढळते. एखादं मूल जर चंचल, दंगोखोर, सतत मस्ती करणारे, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित न करणारं असेल तर आपल्याकडे त्याला खोडकर, आगाऊ, उचापती अशी नावे ठेवली जातात. पण, तज्ज्ञांच्या मते, अशी मुले ही अटेंशन डेफिसिट हायपरऍक्टिव्ह डिसॉर्डर ADHD ची शिकार असतात. ADHD ही एक वर्तवणुकीशी संबंधित मेंदूची अवस्था आहे.
हेही वाचा – हिटलरगिरी करणारे पालक मुलांसाठी घातक, पालकत्वावर तज्ञांचा सल्ला
ADHD ची कारणे –
ही अवस्था अनुवंशिकता. मेंदू संरचनेत बिघाड, वेळेआधी झालेली प्रसुती, गर्भावस्थेत मातेकडून व्यसन, मेंदूला मार लागणे अशा कारणांमुळे निर्माण होते.
उपचार –
- बालरोगतज्ज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी .
- थेरेपिस्टच्या मदतीने मुलांच्या भावनांवर नियंत्रण मिळवावे.
- मुलांच्या आहारात फळे, भाज्या, ओमेगा 3 फॅटी ऍसिडयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
हेही वाचा – मुलं माती, खडूसारख्या गोष्टी का खातात? तज्ज्ञांनी सांगितले यामागील कारण
Comments are closed.