छठ पूजा 2025: छठ पूजा म्हंजे नेम.
दिवाळी झाल्यानंतर देशातील काही भागांमध्ये तयारी सुरू होते ती, छठ पूजेची. विशेष करून भारताच्या उत्तर भागात छठ पूजेचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. यावर्षी छठ पूजेची सुरूवात 25 ऑक्टोबरपासून झाली आहे. ही पूजा चार दिवस असते. यामध्ये उपवास, स्नान आणि जल अर्पण यांसारखे विधी पार पडतात. आपण अनेकदा या पूजेबद्दल ऐकले असेल, मात्र ही पूजा नक्की काय असते? नक्की या पूजेत करतात काय? कोणत्या देवाला ही पूजा समर्पित आहे? जाणून घेऊयात सविस्तरपणे,
छठ पूजा –
चार दिवस करण्यात येण्याऱ्या या पूजेला बिहारमधून सुरुवात झाली. पण, आता बिहारसोबत भारतातील इतर भागात जसे की, बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि नेपाळ येथेही हा उत्सव साजरा केला जातो. ही पूजा सूर्यदेव आणि षष्ठी मैया यांना समर्पित आहे. हा सण मुलांसाठी करण्यात येतो. हे 36 तासांचे व्रत असते. हिंदू पौराणिक कथेनुसार, सूर्यदेव आरोग्याशी संबंधित समस्या दूर करतो आणि सुख-समृद्धी देतो. त्यामुळे आरोग्य आणि समृद्धीसाठी हे व्रत पाळले जाते.
कसा साजरा होतो सण ?
छठ पूजेचा सण चार दिवसांचा असते. भाऊबीजेच्या तिसऱ्या दिवसापासून याची सुरुवात होते. पहिल्या दिवशी खडे मीठ, तूप घालून केलेला अरवा भात आणि भोपळ्याची भाजी प्रसाद म्हणून दिली जाते. दुसऱ्या दिवशी उपवास सुरू होतो. उपवास करणारे दिवसभर अन्न-पाणी सोडून देतात, संध्याकाळी खीर तयार केली जाते. पूजा झाल्यावर प्रसाद देतात, ज्याला खरना असेत म्हणतात. तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याला अर्घ्य दिला जातो. शेवटच्या दिवशी उगवत्या सूर्याला नैवेद्या दाखवला जाते. या चार दिवसात पवित्रतेची खूप जास्त काळजी घेतली जाते.
(टीप – धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई आदी विषयांवरील लेख केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. Manini याची पुष्टी करत नाही. )
हेही वाचा – Vastu Tips: घरात ‘हे’ रोप लावल्याने दूर होतो वास्तुदोष; दैवी गुणधर्मांमुळे ठरते दुर्मिळ
Comments are closed.