चुकूनही बाळाला देऊ नयेत ही खेळणी, विकासात निर्माण करतात अडचणी
एखाद्या घरात आनंदाची बातमी येणार असे समजताच घर बाळ येण्याआधीच खेळण्यांनी भरून जातं. आई-बाबांसह बाळाला भेटायला येणारा प्रत्येकजण बाळासाठी खेळणं घेऊन येतो. खेळणी ही बाळासाठी विशेष गोष्ट असते. या खेळण्यांसोबत लहान मुलं रमून जातात. मुलांसाठी खेळणी खरेदी करताना आपण अनेक गोष्टी लक्षात ठेवतो जसे की खेळणी तीक्ष्ण किंवा टोकदार नसावीत किंवा निकृष्ट दर्जाच्या साहित्यापासून बनवलेली नसावीत. या सर्व गोष्टी पाहताना अनेकदा नकळत बाळाच्या विकासात अडसर ठरतील अशी खेळणी पालकांकाडून मुलांना देण्यात येतात, असे तज्ज्ञ सांगतात. आज आपण जाणून घेऊयात बाळाला कोणत्या खेळण्यांपासून दूर ठेवावं.
बेबी जम्पर –
पालकांनी मुलांना बेबी जंपरपासून दूर ठेवायला हवे. जर खेळायला देणार असाल तर 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ देऊ नये. या बेबी जंपरमुळे बाळाच्या रांगण्याची आणि चालण्याची क्षमता कमी होऊ शकते.
हेही वाचा – मुलं सतत दंगा करतात, शांत बसत नाहीत? असू शकतो हा आजार
बेबी वॉकर –
डॉक्टरांच्या मते, बेबी वॉकर बाळाच्या सेफ्टीच्यादृष्टीने योग्य नाही. बेबी वॉकरला चाकं असल्याने बाळाला दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे बेबी वॉकर बाळाला देऊ नये.
बेबी फ्लोअर सीट –
तज्ज्ञांच्या मते, बेबी फ्लोइर सीट मुलांसाठी हानिकारक आहेत. तुम्ही थोड्या वेळासाठी बाळाला त्यावर बसवू शकता. पण, जास्त वेळ देऊ नये.
6 महिन्याच्या बाळाला कोणती खेळणी देऊ शकतो? – 6 महिन्याच्या बाळाला तो सहज धरू शकेल, वजनाने हलकी, तोडांने धरू शकेल अशी खेळणी देऊ शकता.
1 वर्षाच्या बाळाला कोणती खेळणी देता येतील? – साधारण चित्रे असलेल्या वस्तू, पुस्तकं, रेकॉर्डिंग केलेली गाणी, कविता, टॉय फोन, बाहुली, सॉफ्ट टॉइज देऊ शकता. तुम्ही त्यांना लाकडाची खेळणी देऊ शकता, फक्त ती टोकदार नसावीत, याची खात्री करावी.
हेही वाचा – मुलं माती, खडूसारख्या गोष्टी का खातात? तज्ज्ञांनी सांगितले यामागील कारण
Comments are closed.