World’s Shortest Flight: जगातील सर्वात लहान 53 सेकंदाचा विमान प्रवास
जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यामधील अंतर फार दूर आहे. यासाठी विमानाने प्रवास करणे गरजेचे असते. असे म्हणतात की विमानाने प्रवास केल्यास वेळेची बचत होते. पण तरीही कधीकधी अशी परिस्थिती येते की काही कारणास्तव फ्लाईट डिले होते. त्यामुळे तासंतास एअरपोर्टवर वाट पाहत बसावं लागतं. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, जगात एक विमान प्रवास आहे, ज्यासाठी फक्त 53 सेकंदाचा वेळ लागतो. ( World’s Shortest Flight )
जगातील सर्वात छोटी फ्लाईट म्हणजेच सर्वात कमी वेळेचे हे उड्डाण स्कॉटलंडमध्ये होते. हा कमी वेळेचा विमानप्रवास स्कॉटलंडची दोन बेटे वेस्ट्रो आणि पापा वेस्ट्रेमधून घडतो. खरं तर या दोन बेटांना जोडणारा पूल किंवा रस्ता इथे नाही. त्यामुळे लोकांना फार लांबची वाट धरून हे अंतर कापावे लागते. त्यातच या दोन बेटांमधील समुद्र अत्यंत खडकाळ आहे. त्यामुळे इथे बोट चालवणे खूप कठीण आहे. त्यामुळेच विमानाने हे अंतर पटकन केवळ ५३ सेकंदात कापता येते. हे फ्लाईट इतके लहान आहे की यामध्ये एका वेळी फक्त 8 लोक प्रवास करू शकतात.
पर्यटक आणि स्थानिकांना फायदा (वेस्ट्रे ते पापा वेस्ट्रे फ्लाइट)
या दोन्ही बेटांमध्ये केवळ 2.7 किलोमीटरचे अंतर आहे. आता तुम्हाला वाटत असेल हे अंतर पायी किंवा सायकलनेही कापता येते. मात्र समुद्र आणि पूल, कोणतीही बस किंवा ट्रेन सुविधा नसल्याने हवाई प्रवास हाच पर्याय उरतो. शिवाय असे म्हंटले जाते की, या दोन्ही बेटांमध्ये पूल बांधणे खूप खर्चिक आहे. त्यामुळे आपल्या देशात ज्याप्रमाणे बससेवा सुरू असते, त्याचप्रमाणे इथे हवाई सेवेचा लाभ स्थानिक आणि पर्यटक घेतात.
इतका येतो खर्च (जगातील सर्वात कमी फ्लाइटचा खर्च)
स्कॉटलँडमधील 53 सेकंदांच्या या सर्वात लहान उड्डाणासाठी दररोज प्रवाशांना सुमारे 17 पौंड खर्च करावे लागतात. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास एका तिकिटासाठी 1600 ते 1800 रुपये खर्च करावे लागतात. स्कॉटलंडच्या चलनाच्या तुलनेत हे दर खूपच कमी आहेत. तसेच या दोन बेटांवरील स्थानिकांना सरकारकडून सबसिडी दिली जाते. त्यामुळे या लोकांना कमी खर्च करावा लागतो. या दोन्ही बेटांची मिळून एकूण लोकसंख्या सुमारे 690 च्या आसपास आहे.
Comments are closed.