शॉवर घेताना लघवी करणं महिलांसाठी घातक, जाणून घ्या कोणत्या समस्या वाढू शकतात

आंघोळ म्हणजे शरीराला ताजेतवानं करणारी आणि स्वच्छता राखण्यासाठीची रोजची प्रक्रिया. परंतु या वेळेत अनेक जणी नकळत एक सवय करून घेतात आणि त्याचा पुढे जाऊन आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आंघोळ करताना लघवी करणे ही त्यापैकी एक सर्वसाधारण गोष्ट. ही सवय काहींना अगदी साधी, नैसर्गिक वाटते. पाण्यात उभं असताना लगेच लघवी करून झाली, एवढंच त्यांच्या मते. पण ही सवय दीर्घकाळ ठेवल्यास मूत्राशयापासून ते पेल्विक स्नायूंवर (Pelvic Bone) गंभीर परिणाम होऊ शकतो. (urinating during bath health risk women)

पेल्विक स्नायूंवर ताण वाढतो
बसून लघवी केल्यावर मूत्राशयाला योग्य स्थितीत आधार मिळतो. पण शॉवरमध्ये उभं राहून लघवी केल्याने शरीर पूर्ण रिलॅक्स होत नाही. पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंना ताण येतो. त्यामुळे लघवी पूर्णपणे बाहेर पडत नाही. ही क्रिया रोजची झाली तर स्नायू कमकुवत होण्याचा धोका असतो. महिलांमध्ये गर्भाशय आणि मूत्राशयाचा आधार देणारे हे स्नायू नाजूक असल्याने त्यांना अधिक त्रास होऊ शकतो.

संसर्गाचा धोका वाढतो
अपूर्ण राहिलेली लघवी शरीरात जास्त वेळ राहिल्यास त्यात जंतू वाढू लागतात. ते पुढे मूत्रमार्गात जाऊन संसर्गाची शक्यता वाढवतात. महिलांमध्ये मूत्रमार्ग छोटा असल्याने UTI सारख्या समस्या सहज होतात. यात जळजळ, वारंवार लघवी लागणे, वेदना, ताप अशी त्रासदायक लक्षणे दिसतात. त्यामुळे ही सवय निश्चितच आरोग्यासाठी धोकादायक आहे.

मेंदूला चुकीच्या सिग्नलची सवय लागते
पाण्याचा आवाज ऐकला की लगेच लघवीची इच्छा होते, अशी सवय निर्माण होते. हात धुण्यासाठी नळ चालू केला तरी मूत्राशय लगेच सिग्नल देतो. म्हणजे शरीरात चुकीचा रिफ्लेक्स तयार होतो आणि वारंवार लघवीची समस्या निर्माण होऊ शकते. अनेक महिलांना यामुळे दिवसात खूपदा लघवी लागते आणि कामात अडथळे निर्माण होतात.

महिलांनी काय काळजी घ्यावी?

1) लघवीची योग्य वेळ टाळू नका.
2) टॉयलेटमध्ये जाऊनच लघवी करा.
3) पेल्विक स्नायू मजबूत करण्यासाठी व्यायाम करा.
4) स्वच्छता राखा आणि पाणी पुरेसे प्या.

ही सवय आजपासूनच बंद केली तर पुढील आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात.

जेवल्यावर लघवी करणे फायदेशीर
जेवण झाल्यावर लगेच लघवीला गेल्यास किडनी व्यवस्थित कार्य करते. शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर पडतो आणि मूत्रविकारांपासून संरक्षण मिळते. हृदयासाठी देखील ही सवय चांगली मानली जाते. त्यामुळे हा उपाय अवश्य पाळावा.

दिसायला साधी वाटणारी सवय महिलांच्या आरोग्यासाठी मोठा धोका बनू शकते. त्यामुळे आंघोळीत लघवी करण्याची सवय टाळा आणि बाथरूमचा योग्य वापर करा.

Comments are closed.